टी20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद जिंकल्यानंतर टीम इंडियाला बीसीसीआयकडून बोनस बक्षीस रक्कम म्हणून 125 कोटी रुपये देण्यात आले. टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना बोनस म्हणून 5 कोटी रुपये मिळाले होते. पण त्याने तो नाकारला आणि आपल्या सहकाऱ्यांसारखाच बोनस मागितला. आता रोहित शर्माशी संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार, रोहितने बोनसमध्ये कपात करण्याची मागणीही केली होती. रोहितला सपोर्ट स्टाफसाठी त्याच्या बोनसचा मोठा हिस्सा कमी करायचा होता.
बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंना बोनस जाहीर केला आहे. या बोनस बक्षीस रकमेचे अनेक भाग होते. यामध्ये टीम इंडियाचे वरिष्ठ आणि मुख्य प्रशिक्षक यांना प्रत्येकी 5 कोटी रुपये मिळणार होते. तर सपोर्ट स्टाफ आणि इतर खेळाडूंना यातील अर्धाच पैसा मिळणार होता. या घोषणेनंतर हा पैसा कसा वाटला जावा यावरही चर्चा झाली. यावेळी सपोर्ट स्टाफला खूप कमी पैसे मिळत होते, तेव्हा कॅप्टन रोहित म्हणाला की सपोर्टला कमी पैसे मिळू नयेत. जर पैसे कमी पडले तर ते माझ्या बोनसमधून कापा.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या द्रविडला त्याच्या यशामुळे 5 कोटी रुपयांचा बोनस ऑफर करण्यात आला होता. पण त्याने बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग प्रशिक्षकांइतकीच बोनस बक्षीस रक्कम घेतली. द्रविडने अडीच कोटी रुपये सोडले. अतिरिक्त खेळाडू, फिजिओ, मसाजरसह सर्व सपोर्ट स्टाफसह टीम इंडियाच्या 15 खेळाडूंना बोनस बक्षीस रक्कम देण्यात आली आहे.
टीम इंडियाच्या 15 प्रमुख खेळाडूंना प्रत्येकी 5 कोटी रुपये मिळतील असा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. मुख्य प्रशिक्षक द्रविडलाही 5 कोटी रुपये मिळणार आहेत. कंडिशनिंग कोच, फिजिओ आणि इतर सपोर्ट स्टाफला प्रत्येकी 2 कोटी रुपये मिळणार होते. राखीव खेळाडू म्हणून टीम इंडियासोबत गेलेल्या रिंकू सिंग, आवेश खान, शुभमन गिल आणि खलील अहमद यांनाही प्रत्येकी एक कोटी रुपये देण्याचे ठरले.
महत्तवाच्या बातम्या-
आगामी श्रीलंका दाैऱ्याआधीच गाैतम गंभारची गुगली, हा स्टार होणार भारतीय संघाचा कर्णधार
मी कोणत्या विराट कोहलीला ओळखत नाही, स्टार फुटबाॅलपटूनी भारताच्या माजी कर्णधाराला ओळखण्यास दिला नकार
रवी बिश्नोई बनला जॉन्टी रोड्स…चित्त्याप्रमाणे उडी मारून घेतला जबरदस्त झेल! पाहा VIDEO