टी-२० विश्वचषक २०२१ सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. या स्पर्धेच्या सुपर १२ फेरीतील शेवटचे सामने सुरू आहेत. शनिवारी (०६ नोव्हेंबर) विश्वचषकात दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात महत्वाचा सामना पार पडला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने इंग्लंडला १० धावांनी पराभूत केले, पण तरीही अफ्रिकेचा संघ टी-२० विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. ग्रुप १ मध्ये इंग्लंड उपांत्य सामन्यासाठी पात्र ठरलेला पहिला संघ असून आता उपांत्य सामन्यातील दुसरा संघ ऑस्ट्रेलिया ठरला आहे.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका दोन्ही देशांनी प्रत्येकी चार सामने जिंकले असले तरी, ऑस्ट्रेलियाने त्यांच्या नेट रन रेटच्या मदतीने उपांत्य सामन्यात स्थान पक्के केले आहे. यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, यावर्षीही कोणताच नवीन संघ आयसीसीचे जेतेपद जिंकू शकणार नाही.
आयसीसीच्या अंतर्गत आयोजीत या स्पर्धेत यावर्षीही कोणताच नवीन संघ ट्रॉफी जिंकू शकणार नाही. यापूर्वी आयसीसी स्पर्धेचे जेतेपद जिंकणाऱ्या संघांमध्ये भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज, पाकिस्तान, इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघांचा समावेश आहे. तर आयसीसी स्पर्धेचे जेतेपद मिळवण्यासाठी जे नवीन संघ दावेदार होते, त्यांमध्ये दक्षिण अफ्रिका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांचा सामावेश होता. पण हे संघ जेतेपद जिंकण्यासाठी पात्र ठरणार नाहीत.
यापैकी दक्षिण अफ्रिका आणि बांगलादेश स्पर्धेच्या बाहेर गेले आहेत आणि अफगाणस्तानचा संघ उपांत्य फेरीत जाण्यासाठी झगडताना दिसतो आहे. आता ग्रुप एकचे उपांत्य सामन्यातील दोन्ही संघ पक्के झाले असून ग्रुप दोनचे चित्र अजून स्पष्ट होणे बाकी आहे.
आयसीसीमध्ये मागच्या ७ स्पर्धांचे विजेता संघ
२०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी – भारत
२०१४ टी-२० विश्वचषक – श्रीलंका
२०१५ विश्वचषक – ऑस्ट्रेलिया
२०१६ टी-२० विश्वचषक – वेस्ट इंडीज
२०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी – पाकिस्तान
२०१९ विश्वचषक – इंग्लंड
२०१९-२१ जागतिक कसोटी अजिंक्यपद – न्यूझीलंड
With #SouthAfrica getting eliminated today, it’s pretty much sure we won’t have any new champion. #T20WorldCup https://t.co/4T3TWngB3S
— Bharath Seervi (@SeerviBharath) November 6, 2021
ग्रुप दोनमध्ये उपांत्य सामन्यात पोहोचण्यासाठी भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान हे तीन संघ झगडत आहेत. अशात या तीन संघांपैकी न्यूझीलंड सध्या भक्कम स्थितीत आहे. तर भारताचे नेट रन रेट चांगले आहे. रविवारी होणाऱ्या न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात अफगाणिस्तानने विजय मिळवला तरी, ते उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचतील याची खूपच कमी आशा आहे. जर न्यूझीलंड या सामन्यात पराभूत झाला, तर भारतीय संघाकडे उपांत्य सामन्यात पोहोचण्यासाठी एक शेवटची संधी असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अफलातून! स्टार्कच्या गोलंदाजीवर रसेलने ठोकला टी-२० विश्वचषकातील सर्वात लांब षटकार, पाहून फिंचही थक्क
दक्षिण आफ्रिकेच्या रस्सी व्हॅन डर दसनचा मोठा पराक्रम, डिविलियर्सला मागे टाकत रचला नवीन विक्रम