महाराजा ट्रॉफी केएससीए टी20 लीगसाठी 25 जुलै रोजी खेळाडूंचा लिलाव झाला. या लीगमध्ये एकूण 6 संघ खेळताना दिसणार आहेत, ज्यामध्ये म्हैसूर वॉरियर्स, गुलबर्गा मिस्टिक्स, मंगळुरु ड्रॅगन्स, बेंगळुरू ब्लास्टर्स, हुबळी टायगर्स आणि शिवमोग्गा लायन्स यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे भारतीय संघाकडून खेळलेले काही खेळाडूही या लीगमध्ये सहभागी होणार आहेत. यामध्ये आयपीएलच्या एका हंगामासाठी 10 कोटी रुपये मानधन घेणारा खेळाडू देखील आहे. मात्र या लीगमध्ये या खेळाडूला केवळ एक लाख रुपयांना खरेदी करण्यात आले आहे.
कोट्यवधीत खेळलेला क्रिकेटर फक्त एक लाख रुपयांत खेळणार
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा मैदानात परतण्यासाठी सज्ज झाला आहे. तो महाराजा ट्रॉफी केएससीए टी20 लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. म्हैसूर वॉरियर्सने त्याला 1 लाख रुपयांमध्ये आपल्या संघात सामील केले आहे. क्वाड्रिसेप्स सर्जरीमुळे प्रसिद्ध जानेवारीपासून क्रिकेटच्या मैदानाबाहेर होता. या लीगच्या लिलावात तो 2 लाख रुपयांच्या मूळ किंमतीसह अ श्रेणीचा भाग होता, परंतु पहिल्या फेरीत त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही, त्यानंतर त्याने 1 लाख रुपयांच्या मूळ किंमतीसह दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
आयपीएलमध्ये करोडो रुपये कमावले
प्रसिद्ध कृष्णा 2018 पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. मात्र दुखापतीमुळे त्याला गेल्या दोन हंगामात एकही सामना खेळता आलेला नाही. आयपीएल 2022 च्या लिलावात राजस्थान रॉयल्सने प्रसिद्ध कृष्णाला 10 कोटी रुपयांना विकत घेतले होते. यानंतर, तो आयपीएल 2023 मध्ये 10 कोटी रुपयांसह राजस्थानचाच भाग होता. त्याच वेळी, आयपीएल 2024 मध्ये, तो दुखापतीमुळे हंगाम सुरू होण्यापूर्वीच संघाबाहेर पडला होता. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये 51 सामने खेळले आहेत आणि 8.92 च्या इकॉनॉमी रेटने 49 विकेट्स घेतल्या आहेत.
भारतीय संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळलाय प्रसिद्ध
प्रसिद्ध कृष्णा भारतीय संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. त्याने भारतासाठी आतापर्यंत 2 कसोटी, 17 वनडे आणि 5 टी20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 2, वनडे सामन्यात 29 आणि टी20 सामन्यांत 8 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने या वर्षाच्या सुरुवातीला भारतीय संघासाठी शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला, जो कसोटी सामना होता. तेव्हापासून प्रसिद्ध कृष्णा दुखापतीशी झुंजत होता. मात्र, आता तो पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
गौतम गंभीरचा स्पेशल प्लॅन, टीम इंडियातही होणार केकेआर प्रमाणे प्रयोग! हा खेळाडू घेणार सुनील नारायणची जागा
पंजाब किंग्जचं नशीब बदलेल? रणजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दिग्गज बनू शकतो मुख्य प्रशिक्षक
“कारण त्याच्याकडे परिपक्व संघ..”, रवी शास्त्रींनी गौतम गंभीरबद्दल केलं मोठं वक्तव्य