भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींने नवीन नियुक्त झालेल्या गाैतम गंभीरबाबत मोठे वक्तव्य केले आहे. शास्त्रींच्या मते, गाैतम गंभीर स्वत: खूप तरुण आहे. ज्यामुळे तो टीम इंडियाला नव्या विचारात घेऊन जाऊ शकतो. खरं तरं गाैतम गंभीर रवी शास्त्रीच्या मार्गदर्शनाखाली खेळला आहे. त्यामुळे शास्त्रीनां माहिती आहे की, गंभीर कोणत्या प्रकारचा खेळाडू आहे. श्रीलंकेदाैऱ्यावर असलेल्या टीम इंडियाची पहिली टी20 27 जुलै रोजी तर शेवटचा एकदिवसीय सामना 7 ऑगस्ट रोजी होणार आहे.
रवी शास्त्री यांना विश्वास आहे की गौतम गंभीर भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून त्याच्या नवीन भूमिकेत त्वरित प्रभाव पाडू शकतो, कारण त्याच्याकडे त्याच वयाचा मार्गदर्शक आहे. तो आधीपासूनच संघाच्या जवळ आहे. रवी शास्त्री यांना विश्वास आहे की गौतम गंभीर या स्थितीत अधिक चांगली कामगिरी करू शकतो, कारण तो तुलनेने स्थिर संघाचे नेतृत्व करत आहे आणि अलीकडेच त्याने इंडियन प्रीमियर लीग मध्ये मार्गदर्शक म्हणून यशाची चव चाखली आहे ज्यामध्ये त्याने कोलकाता नाइट रायडर्सचे नेतृत्व केले आणि 10 वर्षांनी तिसरा खिताब जिंंकवून दिला.
पुढे बोलताना रवी शास्त्री म्हणाले, गाैतम गंभीरने आयपीएल मध्ये शानदार कामगिरी केला आहे. तो तरुण असल्याने नवनवीन विचार घेऊन तो समोर येऊ शकतो. तो जास्तीत जास्त खेळाडूंना ओळखतो. विशेषकरुन, पांढऱ्या चेंडूच्या स्पर्धेत. कारण तो आयपीएलमध्ये अनेक संघांचा भाग राहिला आहे. गाैतम गंभीर आयपीएल 2008 पासून त्यामुळे मला ते ताजेतवाने वाटते. आणि गौतमबद्दल आपल्याला माहिती आहे, तो एक साधा माणूस आहे. त्याची स्वतःची मतेही असतील. गंभीरसाठी चांगली गोष्ट म्हणजे त्याच्याकडे परिपक्व संघ आहे. त्याच्याकडे स्थिर संघ आहे.
रवी शास्त्री म्हणाले, ‘साहजिकच प्रशिक्षक म्हणून खेळाडूंना सांभाळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे तो कसा कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मला वाटते या कामासाठी त्याच्याकडे सर्व संसाधने आहेत आणि त्याला अनुभवही आहे. गंभीरच्या यशासाठी प्रत्येक खेळाडूला समजून घेणे आणि त्याचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे ठरेल, असे शास्त्री म्हणाले.
हेही वाचा-
पॅरिस ऑलिम्पिकचं आज भव्य उद्घाटन! 128 वर्षांच्या इतिहासात प्रथमच स्टेडियममध्ये होणार नाही उद्घाटन सोहळा
“तेथे तर दररोज…”, चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी हरभजन सिंगचे पाकिस्तानवर खोचक वक्तव्य
गौतम गंभीरचा स्पेशल प्लॅन, टीम इंडियातही होणार केकेआर प्रमाणे प्रयोग! हा खेळाडू घेणार सुनील नारायणची जागा