आयपीएलच्या १५व्या हंगामासाठी ८ संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआला दिली आहे. मंगळवारी म्हणजेच ३० नोव्हेंबरला यासंदर्भात अधिकृत घोषणा होईल. त्यातच माजी क्रिकेटर आणि समालोचक आकाश चोपडा यांनी सांगितलं आहे की, संघनायक केएल राहुलने पंजाब किंग्जची साथ सोडली तर कोणत्या खेळाडूला कर्णधार केले पाहिजे.
माध्यमांतील काही वृत्तांनुसार असं सांगण्यात आलं आहे की, केएल राहुलला येत्या हंगामात पंजाब किंग्ससोबत रहावं असं वाटत नाही. त्यामुळे तो नवीन संघात समाविष्ट होऊ जाऊ शकतं. यामुळे आकाश चोपडा म्हणालेत की, पंजाब किंग्जने त्यांच्या संघाचे कर्णधारपद मयंक अग्रवालला दिलं पाहिजे.
केएल राहुलकडे कर्णधारपद असताना संघाचं प्रदर्शन एवढं खास नव्हतं. त्याच्या नेतृत्त्वाखाली मागच्या २ हंगामात संघ एकदाही प्लेऑफमध्ये पोहोचू नाही शकला. संघाने साखळी फेरीतील बरेचसे सामने कमी फरकाने गमावले आहेत आणि त्यामुळेच संघ प्लेऑफमध्ये पोहचू नाही शकला.
आपल्या युट्युब चॅनलवर बोलताना आकाश चोपडा म्हणाले की, “पंजाब किंग्स संघ आयपीएल स्पर्धेमध्ये सर्वात खराब प्रदर्शन करणारा संघ राहिला आहे. त्यांनी सर्वात कमी वेळा प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी एकदाही विजेतेपद पटकावलेलं नाही. केएल राहुल संघ सोडत असेल तर कर्णधारपदासाठी माझी पहिली पसंती मयंक अग्रवालला असेल.”
आकाश चोपडाने हे देखील म्हटले की पंजाब किंग्सने निकोलस पूरन आणि एडन मार्क्रम यांना देखील रिटेन केले पाहिजे, ते मोहालीच्या मैदानावर जास्त धावा करू शकतात.
पंजाब किंग्ज संघाने २०१८ मध्ये झालेल्या लिलावात केएल राहुलला ११ कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. केएल राहुल आता पंजाब किंग्ज संघाचे कर्णधारपद सोडून आयपीएल २०२२ स्पर्धेत संजीव गोएंका यांच्या लखनऊ फ्रँचायझीमध्ये प्रवेश करू शकतो. त्याला या संघाचे कर्णधारपद देखील दिले जाऊ शकते.
महत्वाच्या बातम्या-
जहाँ जाऊँ, तुझे पाऊँ..! उतावळा शार्दुल साखरपुड्यात मितालीसोबत भलताच रोमँटिक, व्हिडिओ पाहाच
अबब! क्रिकेटविश्वातील फक्त ‘या’ २ संघांनी कसोटी सामन्याच्या एका डावात चोपल्यात ९०० हून जास्त धावा