सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सध्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लॅब्यूशानेने १९६ चेंडूत ९१ धावांची खेळी केली. त्याचे शतक थोडक्यात हुकले. तो या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (८ जानेवारी) रविंद्र जडेजाच्या चेंडूवर झेलबाद झाला. असे असले तरी तो गुरुवारी सामन्याच्या पहिल्या दिवशी बॅटची ग्रीप नीट बसवताना हँडेलवर फुंकर घातल्यामुळे चर्चेत आला होता. याबाबत आता त्याने स्पष्टीकरण दिले आहे.
नक्की काय झाले होते ?
झाले असे की पहिल्या दिवशी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेला लॅब्यूशाने त्याचे अर्धशतक पूर्ण केल्यानंतर डावाच्या ४५ व्या षटकादरम्यान त्याच्या बॅटची ग्रीप नीट बसवत होता. त्याने ती ग्रीप बसवल्यानंतर बॅटच्या हँडेलवर फुंकर मारली. त्याचा हा प्रकारपाहून कोणालाही तो नक्की काय करतोय, हे समजले नाही. त्याचा असा ग्रीप बसवताना फुंकर मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला होता.
अखेर यामागचं कारण त्याने शुक्रवारी उलगडले आहे. त्याने सांगितले की ‘मला माहित होते, मला हा प्रश्न विचारण्यात येणार आहे. माझी ग्रीप बाहेर आली होती आणि पातळ झाली होती आणि मला जाड ग्रीपची गरज होती. जर तुम्ही ग्रीपच्या वरच्या बाजूला हवा भरली तर ती ग्रीपला मोठे करुन खाली ढकलते. हेच मी करत होतो. अनेक ग्रीप बदलल्यानंतर ही मला सापडलेली पद्धत आहे. कदाचीत हे कॅमेऱ्यामध्ये चांगले दिसत नसावे.’
Marnus knew this question was coming… Here's the story behind the unorthodox method for changing his bat grip.#AUSvIND | @alintaenergy pic.twitter.com/v57vMXtWT7
— cricket.com.au (@cricketcomau) January 8, 2021
Running repairs on the bat grip for Marnus Labuschagne 😅 #AUSvIND pic.twitter.com/FfQahP81TZ
— 7Cricket (@7Cricket) January 7, 2021
दुसऱ्या दिवसाखेर भारताच्या ९६ धावा –
लॅब्यूशानेने या सामन्यात शानदार फलंदाजी करताना पहिल्या डावात पदार्पण करणाऱ्या विल पुकोस्कीसह १०० आणि स्टिव्ह स्मिथसह १०० धावांची भागीदारी केली. पुकोस्कीने ६२ धावांची तर स्मिथने १३१ धावांची खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ३३८ धावा करता आल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाखेर २ बाद ९६ धावा केल्या आहेत. भारताकडून शुबमन गिलने ५० धावांची खेळी केली. दुसऱ्या दिवसाखेर अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा नाबाद खेळत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
विमान कोसळलं! हेलिकॉप्टर शॉट मारण्याच्या नादात राशिद गोल्डन डक; समालोचकांनाही आवरेना हसू
“बुमराहवरील कामाचा भार कमी करा, अन्यथा…”, जहीर खानचा भारतीय संघाला सावधगिरीचा इशारा
एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी… तिकडे रोहित शर्मा ३० चेंडू खेळला अन् इकडे काकांनी अर्धी मिशी काढली!