नुकताच इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (ENG vs AUS) यांच्यात ऍशेस मालिका २०२१ (Ashes Series 2021) मधील तिसरा कसोटी सामना पार पडला. तिसऱ्या दिवशीच (२८ डिसेंबर) यजमान ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला एक डाव आणि १४ धावांनी पराभूत करत ही मालिका खिशात घातली आहे. हा त्यांचा ऍशेसमधील सलग तिसरा विजय होता. इंग्लंडचे निराशाजनक फलंदाजी प्रदर्शन या पराभवाला कारणीभूत ठरले आहे. याच इंग्लंडचे फलंदाज वर्ष २०२१ मध्ये सर्वाधिकवेळा शून्यावरही बाद झाले (Most Test Ducks In 2021) आहेत. मात्र दुसरीकडे त्यांच्या ५ फलंदाजांनी संघाची लाज (5 England Batsman With No Duck In 2021) राखली आहे. हे फलंदाज एकदाही वर्षभरात शून्यावर बाद झालेले नाहीत.
इंग्लंडचा संघ एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक डक (फलंदाज शून्यावर बाद) करणाऱ्या संघांच्या यादीत अव्वलस्थानी आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, इंग्लंडने त्यांचाच जुना विक्रम मोडत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
वर्ष २०२१ मध्ये इंग्लंडकडून तब्बल २५ क्रिकेटपटू खेळले आहेत. यातील २० क्रिकेटपटू वर्षभरात एकदा ना एकदा शून्यावर बाद झाले आहेत. परंतु त्यांचे ५ क्रिकेटपटू असे आहेत, जे एकदाही शून्यावर आपली विकेट न गमवण्यात यशस्वी राहिले आहेत. वर्ष २०२१ मध्ये इंग्लंडकडून कसोटी सामने खेळताना एकदाही शून्यावर आपली विकेट न गमावणाऱ्या इंग्लिश फलंदाजांमध्ये बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स, क्रेग ओव्हरटन, बेन फोक्स, ऑली पोप यांचा समावेश आहे. यांपैकी पोप सर्वाधिक १८ कसोटी डावांमध्ये फलंदाजी करताना एक तरी धाव करत पव्हेलियनला परतला आहे. त्याच्यानंतर स्टोक्स १४ कसोटी डाव, वोक्स आणि फोक्स ६ कसोटी डाव व ओव्हरटन ३ कसोटी डावांमध्ये एकदाही शून्यावर बाद झालेले नाहीत.
इंग्लंडच्या २० फलंदाजांनी मिळून केलेत ५४ डक
दुसरीकडे शून्यावर बाद होणाऱ्या २५ इंग्लिश क्रिकेटपटूंनी १५ कसोटी सामने खेळताना ३०२ डावांमध्ये फलंदाजी करताना ५४ वेळा शून्यावर आपली विकेट गमावली आहे. यापूर्वी १९९८ मध्ये इंग्लंडच्या फलंदाजांनी ५४ वेळा डक केला होता. मात्र त्यावेळी २८ खेळाडूंनी मिळून १६ कसोटी सामने खेळताना ही नकोशी कामगिरी केली होती.
इंग्लंडनंतर वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया आणि भारत हे संघ टॉप-५ मध्ये आहेत. वेस्ट इंडिजच्या संघाने २००० साली ४४ डक करत हा नकोसा विक्रम केला होता. तर ऑस्ट्रेलियाने १९९९ मध्ये ४० आणि भारताने २०१८ मध्ये ३९ वेळा हे नकोशे काम केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताच्या माजी दिग्गज क्रिकेटपटूचा भाजपात पक्षप्रवेश! क्रिकेटनंतर आता राजकीय आखाडा गाजवणार
हेही पाहा-