इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्याची गणना क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये केली जाते. अलीकडेच जिमी अँडरसननं भारताविरुद्ध कसोटी मालिका खेळली. यानंतर त्यानं त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला अलविदा केला. तो या महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे.
जिमी अँडरसन हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 700 बळींचा टप्पा गाठणारा पहिला वेगवान गोलंदाज आहे. आतापर्यंत त्याच्याशिवाय इतर कोणत्याही वेगवान गोलंदाजानं हा आकडा गाठलेला नाही. जिमी अँडरसननं कसोटीशिवाय एकदिवसीय आणि टी20 फॉरमॅटमध्ये देखील इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं आहे.
सध्या जिमी अँडरसनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या वेगवान गोलंदाजानं वयाच्या 42व्या वर्षी आपल्या धारदार गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. जिमी अँडरसननं काऊंटी क्रिकेटमधील सामन्यात 10 षटकांत 19 धावा देऊन 6 फलंदाजांना तंबूत धाडलं. त्याच्या या कामगिरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यूजर्स यावर सतत कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत. चाहत्यांचं म्हणणे आहे की, अँडरसन 42 वर्षांचा झाला असला तरी त्याच्या गोलंदाजीची धार जराही कमी झालेली नाही. तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.
JAMES ANDERSON: 10-2-19-6 IN COUNTY CRICKET. 🤯🔥
– He will be 42-years-old on July 30th. 🐐 pic.twitter.com/rsQAL5CZyB
— Johns. (@CricCrazyJohns) July 2, 2024
जिमी अँडरसनच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर, या वेगवान गोलंदाजानं 187 कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं, ज्यामध्ये त्यानं 26.53 च्या सरासरीनं 700 विकेट घेतल्या. याशिवाय जिमी अँडरसनने 194 एकदिवसीय सामन्यांमध्ये 29.22 ची सरासरी आणि 4.92 च्या इकॉनॉमीनं 269 विकेट घेतल्या आहेत. तसेच, त्यानं इंग्लंडकडून 19 टी20 सामन्यांमध्ये 7.85 ची इकॉनॉमी आणि 30.67 च्या सरासरीनं 18 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
टी20 विश्वचषकानंतर या 9 दिग्गजांनी घेतली निवृत्ती; काहींनी टी20, तर काहींनी सर्व फॉरमॅटला केलं बाय-बाय!
पुढील आयसीसी स्पर्धा कधी आणि कुठे खेळली जाईल? जाणून घ्या सर्व अपडेट
“नेपाळचा संघही त्याला आपल्या टीममध्ये स्थान देणार नाही”, शोएब मलिकनं केला बाबर आझमचा अपमान