नागपूर। रविवारी (10 नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात पार पडलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक टी20 सामन्यात(3rd T20I) भारताने 30 धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने 3 सामन्यांची टी20 मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली आहे.
भारताच्या या विजयात दीपक चाहरने(Deepak Chahar) हॅट्रिकसह 6 विकेट्स घेत महत्त्वाचा वाटा उचलला. त्याने 3.2 षटके गोलंदाजी करताना केवळ 7 धावा देत या 6 विकेट घेतल्या.
चाहरने बांगलादेश विरुद्ध 18 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शफिउल इस्लामला बाद केले. त्यानंतर त्याने 20 व्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर अनुक्रमे मुस्तफिजूर रेहमान आणि अल-अमिन हुसेनला बाद करत हॅट्रिक घेतली.
त्यामुळे चाहर आंतरराष्ट्रीय टी20मध्ये हॅट्रिक(hat-trick) घेणारा भारताचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. तसेच 2019मध्ये भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा तो एकूण तिसरा गोलंदाज ठरला आहे.
यावर्षात चाहरच्या आधी भारताकडून जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) कसोटीत आणि मोहम्मद शमीने(Mohammed Shami) वनडेमध्ये हॅट्रिक घेतली आहे. त्यामुळे एकाच वर्षात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात हॅट्रिक घेणारा भारत पहिलाच संघ ठरला आहे.
बुमराहने ऑगस्टमध्ये किंग्स्टन येथे वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळताना हॅट्रिक घेतली होती. तसेच त्याआधी शमीने यावर्षी जूनमध्ये 2019 वनडे विश्वचषकात अफगाणिस्तान विरुद्ध साऊथँम्पटन येथे खेळताना हॅट्रिक घेतली होती.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2019 मध्ये हॅट्रिक घेणारे भारतीय गोलंदाज –
कसोटी – जसप्रीत बुमराह (विरुद्ध वेस्ट इंडिज, किंग्स्टन)
वनडे – मोहम्मद शमी (विरुद्ध अफगाणिस्तान, साऊथँप्टन)
आंतरराष्ट्रीय टी20 –दिपक चाहर (विरुद्ध बांगलादेश, नागपूर)
हे आहेत भारताकडून पहिली कसोटी, वनडे आणि टी२०मध्ये हॅट्रिक घेणारे गोलंदाज
वाचा👉https://t.co/qEFP9Atg3d👈#म #मराठी #INDvsBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #deepakchahar #TeamIndia— Maha Sports (@Maha_Sports) November 11, 2019
संपूर्ण यादी – क्रिकेट इतिहासात हॅट्रिक घेणारे टीम इंडियाचे शिलेदार
वाचा👉https://t.co/gwkSAjEU58👈#म #मराठी #INDvsBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #deepakchahar #TeamIndia— Maha Sports (@Maha_Sports) November 11, 2019