पुणे: सत्यम व्हेकेशन्स यांच्या तर्फे आयोजित ४थ्या सत्यम व्हेकेशन्स कॉर्पोरेट टी-२०क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत टेक महिंद्रा, एचडीएफसी बँक या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
पूना क्लब क्रिकेट मैदान आणि लिजेंड्स क्रिकेट मैदान येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात सचिन पिंपरीकर(३-८)याने केलेल्या हॅट्ट्रिक कामगिरीच्या जोरावर टेक महिंद्रा संघाने सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाचा ६०धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना टेक महिंद्रा संघाने २०षटकात ९बाद १४१धावा केल्या.
यात सचिन पिंपरीकर २८, अमितोष निखर २५, प्रतीक दुबे ३०यांनी धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. सॉफ्टहार्ड ऑटोमेशनकडून अमित गणपुले(२-३६), स्नेहलकुमार कासार(२-१७), पराग सराफ(२-१७)यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. याच्या उत्तरात सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाचा डाव १७.१षटकात ८१धावावर आटोपला.
यात अभिमन्यू ढमढेरेने सर्वाधिक २१धावा केल्या. सचिन पिंपरीकर याने दुसऱ्या षटकात पाचव्या चेंडूवर श्रीकांत कासारला त्रिफळा बाद केले, त्यानंतर सहाव्या चेंडूवर स्वप्नील चिकळेला पायचीत बाद केले व आपल्या तिसऱ्या षटकात पहिल्याच चेंडूवर स्नेहलकुमार कासारला त्रिफळा बाद करून ८ धावात ३ गडी बाद करून हॅट्ट्रिक कामगिरी केली. सचिनला अभिनव जगतापने १८ धावात ३गडी बाद करून सुरेख साथ दिली. सामन्याचा मानकरी सचिन पिंपरीकर ठरला.
दुसऱ्या सामन्यात शंभूराज घुलेच्या नाबाद ४८धावांच्या खेळीच्या जोरावर एचडीएफसी बँक संघाने व्होडाफोन संघाचा ६ धावांनी पराभव करून धडाकेबाज सुरुवात केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:-
टेक महिंद्रा: २०षटकात ९बाद १४१धावा(सचिन पिंपरीकर २८(२८), अमितोष निखर २५(२४), प्रतीक दुबे ३०(१८), अमित गणपुले २-३६, स्नेहलकुमार कासार २-१७, पराग सराफ २-१७)वि.वि.सॉफ्टहार्ड ऑटोमेशन: १७.१षटकात सर्वबाद ८१धावा(अभिमन्यू ढमढेरे २१(१४), अभिनव जगताप ३-१८, सचिन पिंपरीकर ३-८); सामनावीर-सचिन पिंपरीकर; टेक महिंद्रा ६० धावांनी;
एचडीएफसी बँक: २०षटकात ७बाद १२६धावा(शंभूराज घुले नाबाद ४८(४८), अच्युत मराठे नाबाद २३(१६), क्रांती महाजन ३-१८, वाल्मिक परदेशी २-१६)वि.वि.व्होडाफोन: १९.५षटकात सर्वबाद १२०धावा(आशिष महादेवी ५५(४२), प्रणय हलगेकर २७(१९), अंबर सोमण २-३७, सुशील शेवाळे २-२६);सामनावीर-शंभूराज घुले; एचडीएफसी ६धावांनी विजयी.