आशिया चषक 2023 साठी श्रीलंकन संघाची घोषणा मंगळवारी (29 ऑगस्ट) केली गेली. संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांसाठी नक्कीचे हा संघ निवडणे कठीण गेले. कारण संघातील महत्वाचे खेलाडू दुखापतीमुळे उपलब्ध नाहीत. अशात आशिया चषकात श्रीलंकन संघाचे प्रदर्शन खालावण्याची शक्यताही नाकारता येणार नाही.
श्रीलंकन संघाचा अष्टपैलू आणि महत्वाचा खेळाडू वानिंद सहरंगा देखील दुखापतीमुळे आशिया चषक 2023 खेळू शकणार नाहीये. हसरंगाव्यतिरिक्त वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंका, दुश्मंता चमीरा आणि लाहिरु कुमार यांनाही दुखापीतमुळे आशिया चषक संघात घेतले गेले नाहीये. पुढचा मोठा काळ हे खेळाडू संघातून बाहेर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात श्रीलंकन संघाची चिंता वाडली आहे. आघामी वनडे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर हे चारही खेळाडू श्रीलंकन संघासाठी महत्वाचे आहेत.
Sri Lanka unveils its powerhouse squad for the Asia Cup 2023! 🇱🇰🏆 #AsiaCup2023 pic.twitter.com/duAXDfQyFQ
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) August 29, 2023
आशिया चषक 2023ची सुरुवात 30 ऑगस्ट रोजी होणार आहे. स्पर्धेतील आपले अभियान श्रीलंका संघ 31 ऑगस्ट रोजी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातून करेल. आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र, 13 पैकी 9 सामने श्रीलंकेत खेळले जाणार आहेत. अवघे चार सामने पाकिस्तानमध्ये आयोजित केले गेले आहेत. भारतीय संघ आमले सर्व सामने श्रीलंकेत खेळेल.
आशिया चषक 2023 साठी श्रीलंका संघ – दासून शनाका (कर्णधार), पाथूम निसांका, दिमूथ करुणारत्ने, कुसल जेनिथ परेरा, कुसल मेंडिस (उपकर्णधार), चरीथ असलांका, धनंजय डी सिल्वा, सदीरा समरविक्रमा, महीश थिक्षाना, डुनिथ वेललागे, मथीशा पथिराना, कासून राजिथा, दुशान हेमंथा, बिनुरा फर्नांडो और प्रमोद मदुशन. (Sri Lanka unveils its squad for the Asia Cup 2023!)
महत्वाच्या बातम्या –
राहुलच्या अनुपस्थितीत संजू सॅमसनला संधी मिळणार, आशिया चषकात काय निर्णया घेणार संघ व्यवस्थापन?
याला म्हणतात क्रेझ! सरावानंतर ‘किंग’ कोहलीला दिसताच चाहत्यांनी केला ‘विराट-विराट’चा जयघोष, Video