राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागीने रविवारी (१९ ऑक्टोबर) अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध झालेल्या सामन्यात जबरदस्त गोलंदाजी केली. या १९ वर्षीय खेळाडूने सामन्यातील त्याच्या पहिल्याच षटकात चेन्नईच्या धाकड सलामीवीर फलंदाज शेन वॉटसनची विकेट पटकावली.
नाणेफेक जिंकत सुरुवातीला फलंदाजीसाठी आलेला चेन्नईचा फलंदाज फाफ डू प्लेसिस २.६ षटकात १० धावा करत पव्हेलियनला परतला. त्यामुळे वॉटसन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. त्याचवेळी राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने त्यागीला डावातील चौथे षटक टाकण्यासाठी पाठवले.
त्याच्या त्या षटकात सॅम करनने १ आणि वॉटसनने सलग २ चौकार मारत १३ धावा केल्या. षटकातील शेवटच्या चेंडूवर वॉटसन मोठा शॉट मारायला गेला. पण राजस्थानच्या राहुल तेवतियाने वॉटसनने मारलेला तो चेंडू झेलला. त्यामुळे हा ३९ वर्षीय वॉटसन ३ चेंडूत ८ धावा करत मैदानाबाहेर पडला.
महत्त्वाची बाब म्हणजे, जेव्हा वॉटसनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, तेव्हा त्यागी केवळ ५६ दिवसांचा होता. ८ नोव्हेंबर २००० साली त्यागीचा जन्म झाला होता आणि २०००-०१ दरम्यान वॉटसनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते.
त्यामुळे पूर्ण डावात ४ षटके टाकत ३५ धावा दिलेल्या त्यागीसाठी वॉटसनची एकमेव विकेट खूप महत्त्वाची ठरली.
महत्त्वाच्या बातम्या-
धोनीची निती वापरली धोनीलाच! संजू सॅमसनने असा केला धोनीचा गेम
राजस्थानविरुद्धचा अटीतटीचा सामना धोनीसाठी ठरला खूपच खास, पाहा का ते
‘२० सिट- अप्स करत असशील तर ३० कर’, माजी पाकिस्तानी दिग्गजाचा धोनीला मौल्यवान सल्ला
ट्रेंडिंग लेख-
कधी खेळली गेली होती पहिली सुपर ओव्हर? घ्या जाणून
आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’