विंडिजविरूद्धच्या वन-डे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड झाली आहे. निवड समितीने युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला संघात स्थान दिले आहे.
रिषभ जरी भारतीय संघात निवडला गेला असला तरी भारतीय संघाचा मुख्य यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीच असणार आहे. धोनीला चांगली कामगिरी करून स्वत:ला सिद्ध करून दाखवावे लागणार आहे.
गौतम गंभीरचा मात्र माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या क्षमतांवर विश्वास असून तो भारतीय संघासाठी चांगली कामगिरी करू शकतो असा विश्वास व्यक्त केला आहे.
“कामगिरीच्या निकषावरच खेळाडूंना संघात स्थान द्यायला पाहिजे. जर तुम्ही चांगली कामगिरी केली नाही तर तुम्हाला संघात संधी मिळणार नाही. वय हा मुद्दा फार महत्वाचा नाही. धोनी चांगली कामगिरी करून आपल्या टीकाकारांना नक्कीच उत्तर देईल.” असे गंभीरने म्हटले आहे.
कसोटीत पदार्पण करणाऱ्या पंतने चांगलेच प्रभावित केले आहे. त्यामुळे त्याला वन-डे संघात स्थान देण्यात आले आहे. भारतीय संघ व्यवस्थापन त्याचा वापर मधल्या फळीत किंवा फिनीशर म्हणून उपयोग करू शकतात.
“धोनी हाच भारतीय संघाचा विकेटकिपर असणार आहे. दुसऱ्या विकेट किपरसाठी आम्ही आधी दिनेश कार्तिकला संधी दिली होती. आता रिषभ पंतला संधी दिली आहे. या दोघांमधील एकाला संधी देण्यात येणार आहे.” असे निवड समितीचे मुख्य सदस्य एमकेएस प्रसाद यांनी संघ जाहीर केल्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले.
महत्वाच्य बातम्या-
- कर्णधार धोनीची तुलना विराट आणि रोहित सोबत करणे अयोग्य
- हार्दिक पांड्याच्या घरी झाले नविन सदस्याचे आगमन
- खेळपट्टीचा अंदाज पाहून जेसन होल्डरचा प्रथम फलंदाजीची निर्णय