2019 विश्वचषकात भारताचा न्यूझीलंड विरुद्धचा गुरुवारी(13 जून) होणारा सामना पावसामुळे रद्द झाला आहे. आता भारताचा पुढील सामना रविवारी(16 जून) पाकिस्तान विरुद्ध होणार आहे.
या सामन्याबद्दल बोलताना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे की सामन्यातून खेळाडूंमधील सर्वोत्तम कामगिरी बाहेर येईल. तसेच या सामन्याचा भाग होणे ही अभिमानाची गोष्ट आहे.
न्यूझीलंड विरुद्धचा सामना रद्द झाल्यानंतर बोलताना विराट म्हणाला, ‘आम्ही चांगले क्रिकेट खेळले आहे. आम्ही कोणत्या स्थानावर आहोत याची आम्ही काळजी करत नाही. दोन विजय तुम्हाला आत्मविश्वास देतात. अजून काही सराव सत्र आमच्यासाठी पुरेसे असतील. रविवारचा सामना हा आमच्यासाठी नेहमीसारखा एक सामना आहे.’
तसेच पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याविषयी बोलताना विराट म्हणाला, ‘हा सामना अनेक वर्षांपासून स्पर्धात्मक राहिला आहे. जगातील सर्वांसाठी हा महत्त्वाचा सामना आहे. अशा मोठ्या सामन्याचा भाग होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. हा सामना आमच्यातील सर्वोत्तम कामगिरी बाहेर आणेल.’
‘जेव्हा तूम्ही मैदानात प्रवेश करता, तेव्हा सर्वकाही शांत असते. पण जे खेळाडू पहिल्यांदा हा सामना खेळत असतात त्यांच्यासाठी या सामन्याच्या आजूबाजूला असणारे उत्साहवर्धक वातावरण थोडे भीतीदायक असते. आमच्यासाठी हा सामना फक्त मैदानात जाऊन आमच्या योजना आणि कौशल्याची अंबलबजावणी करणे असा आहे.’
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रविवारी(16 जून) मॅनचेस्टर येथे ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–जाणून घ्या, विश्वचषक इतिहासात एकही चेंडूचा खेळ न होता किती सामने झाले आहेत रद्द
–भारताचे प्रशिक्षक म्हणतात, केएल राहुलने बनावे टीम इंडियाच्या या दिग्गज क्रिकेटर सारखे…
–ग्लेन मॅक्सवेलने पाकिस्तानच्या कर्णधाराला केले अफलातून रनआऊट, पहा व्हिडिओ