इंडियन प्रीमियर लीग 2023मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रदर्शन खूपच सुमार राहिले आहे. दिल्लीने गुरुवारी (11 मे) चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात 27 धावांनी पराभव स्वीकारला. हंगामातील हा त्यांचा 12 वा सामना होता. सीएसके सध्या गुणतालिकेत 12 पैक 7 सामने जिंकल्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण दुसरीकडे दिल्लीने 11 पैक अवघे 4 सामने जिंकले आहेत. दिल्लीव्यतिरिक्त अजून पाच संघ असे आहेत, ज्यांना अजून एक पराभव मिळाला, तरीही आयपीएल 2023मधून त्यांचा पत्ता कट होऊ शकतो.
दिल्लीने आपल्या पुढच्या तिन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला. तरी संघाकडे कसेबसे 14 गुण होतील. इतर संघांचे प्रदर्शन पाहता 14 गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचणे दिल्लीसाठी जवळपास अशक्यच दिसते. सोबत संघाचा नेट रन रेट देखील 0.605 आहे. दिल्लीव्यतिरिक्त अजून पाच संघ आहेत, ज्यांच्यासाठी प्लेऑफचा प्रवास कठीण दिसत आहे. यात राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांचा समावेश आहे. आपण या लेखात या पाच संघांच्या प्रदर्शनावर नजर टाकणार आहेत. तसेच येत्या काळात या संघांना किती आणि कोनाविरुद्ध सामने जिंकवे लागणार याचीही माहिती घेणार आहोत.
1. राजस्थान रॉयल्स –
कर्णधार संजू सॅमसन याच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सने या हंगामाची सुरुवात जबरदस्त केली होती. पण मागच्या 6 सामन्यांपैकी 5 सामन्यात राजस्थानला पराभव स्वीकारावा लागला, ज्यामुळे गुणातालिकेतील त्यांचे स्थान ढासळले. राजस्थानने हंगामातील एकूण 11 पैकी पाच सामने जिंकले आहेत आणि 10 गुण त्यांच्याकडे आहेत. हंगामातील पुढचे तीन सामने राजस्थानला अनुक्रमे कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पंजाब किंग्ज यांच्याविरुद्ध खेळायचे आहेत.
2. कोलकाता नाईट रायडर्स –
केकेआरसाठी हंगामाची सुरुवात अपेक्षित नव्हती. मात्र नितीश राणा यांच्या नेतृत्वाती संघ आता लयीत आला आहे. आतापर्यंत खेळलेल्या 11 पैकी 5 सामने केकेआरने जिंकले आहेत आणि 10 गुणांसह गुणातिलेकत 6व्या क्रमांकावर आहे. ग्रुप स्टेजमध्ये अजून तीन सामने केकेआरला अनुक्रमे राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळायचे आहेत. या तीन पैकी एक सामना जरी केकेआरने गमावला, तर प्लेऑफमधील त्यांचे स्थान जाऊ शकते.
3. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर –
फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल आणि विराट कोहली चालू आयपीएल हंगामात चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून आरसीबीला पराभव मिळाला. या पराभवानंतर प्लेऑफसाठी आरसीबीला झगडावे लागणार, हे निश्चित झाले. आरसीबीनेही आतापर्यंत 11 सामने खेळले असून त्यापैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. 10 गुणांसह संघ सध्या सातव्या क्रमांकावर आहे. राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात यायटन्सविरुद्ध प्रत्येकी एक सामना आरसीबीला येत्या काळात खेळायचा आहे.
4. पंजाब किंग्ज –
शिखर धवन यावर्षी पंजाब किंग्जचा कर्णदार बनला. धवनच्या नेतृत्वात पंजाबचा प्रवास आतापर्यंत चढ-उतारांने भरलेला राहिला आहे. पहिल्या दोन सामने सोडले, तर पंजाबला एकदाही लागोपाठ दोन विजय मिळवता आले नाहीत. 11 पैकी 5 सामन्यात विजय मिळवून पंजाब किंग्ज 10 गुणांसह गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहे. पंजाबला अजून तीन सामने खेळायचे आहेत. यातील तोन सामन्यांत त्यांच्यापुढे दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान असेल, तर एक सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळायचा आहे.
5. सनरायझर्स हैदराबाद –
ऍडन मार्करम याच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबादचा प्रवास आतापर्यंत खडतर राहिला आहे. हंगामातील 10 सामन्यांपैकी 4 सामन्यांमध्ये हैदराबादला विजय मिळवता आला आहे. हैदराबादला 16 गुण मिळवण्यासाठी अजून चार सामने जिंकावे लागणार आहेत. हे चार सामने हैदराबादला लखनऊ सुपर जायंट्स, गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळायचे आहेत. (These five teams are on the verge of exiting the IPL)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विजयी मार्गावरून घसरलेल्या राजस्थान रॉयल्सबाबत दिग्गजाचे मोठे वक्तव्य, म्हणाला, “तुम्ही हरण्यासाठी…”
वर्ल्डकपसाठी पाकिस्तान आणतेय आयसीसीवर दबाव? पडद्यामागे हलतायेत सूत्र