आयपीएलनंतर प्रेक्षकांना मोठमोठ्या स्पर्धांचा आनंद लुटता येणार आहे. त्यातीलच एक मोठी स्पर्धा म्हणजे आयसीसी वनडे विश्वचषक 2023 होय. वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचे आयोजन ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान भारतात होणार आहे. स्पर्धेच्या वेळापत्रक विषयी काही बातम्या समोर येत आहेत. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच पीसीबी अजूनही विश्वचषकासाठी खोडा घालण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजते आहे.
आगामी वनडे विश्वचषकाबाबत बीसीसीआय व पीसीबी मागील वर्षभरापासून चर्चा करत आहेत. विश्वचषकाआधी पाकिस्तानात होणाऱ्या आशिया चषकात भारतीय संघाने सहभागी व्हावे अशी पीसीबीची अपेक्षा आहे. मात्र, बीसीसीआयने यासाठी स्पष्ट नकार दिलेला. भारतीय संघ पाकिस्तानात आला नाही तर, पाकिस्तानदेखील विश्वचषकासाठी येणार नाही अशी धमकी पीसीबीने दिलेली. मात्र, त्यानंतर त्यांनी माघार घेत आशिया चषकातील भारताचे सामने युएईमध्ये खेळण्याचे निश्चित केले गेलेले. मात्र पाकिस्तानला पाकिस्तानात खेळवण्याचा व इतर संघांना बाहेर खेळण्याच्या निर्णयावर बांगलादेश व श्रीलंकेने आक्षेप घेतलेला. या स्थितीत आशिया चषक श्रीलंकेत आयोजित करण्याचा निर्णय जवळपास अंतिम झाला आहे.
या सर्व घडामोडींमुळे पाकिस्तान बॅकफुटला गेला असताना, पीसीबीने आयसीसीला वेठीस धरण्यात सुरुवात केली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघ विश्वचषक खेळण्यासाठी भारतात येणार अशी कोणतीही लेखी हमी अद्याप पीसीबीने दिली नाही. त्यामुळे अचानक पाकिस्तान विश्वचषकातून बाहेर पडण्याची धमकी आयसीसीला देत असल्याचे सांगितले जात आहे.
आपण पाकिस्तानात खेळण्यासाठी तयार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट सांगितले आहे. तसेच पाकिस्तान सहभागी झाला नाही तरी, विश्वचषक खेळवला जाऊ शकतो असे देखील म्हटले जात आहे. विश्वचषकापूर्वी आशिया चषकाचे ऑगस्ट महिन्यात आयोजन केले जाईल.
(PCB Trying Dominate ICC Over Asia Cup And World Cup Hosting)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शिवम दुबे बनलाय नवी ‘सिक्स हिटिंग मशिन’! आयपीएल 2023 मधील आकडेवारी ‘एकदम झकास’
वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतीय बॉक्सर्सने रचला इतिहास! एकाच दिवशी तीन मेडल केले पक्के