भारताचा श्रीलंका दौरा नुकताच संपला. या दौऱ्यावर भारतानं 3 सामन्यांची एकदिवसीय आणि टी20 मालिका खेळली. 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत भारतानं श्रीलकेचा 3-0 अशा फरकानं धुव्वा उडवला. तर एकदिवसीय मालिकेत श्रीलंकेनं भारताचा 2-0 अशा फरकानं धुव्वा उडवला. आता भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यामधील पहिला कसोटी सामना (19 सप्टेंबर) रोजी खेळला जाणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर रंगणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघाचे अनेक खेळाडू या मालिकेच्या तयारीसाठी दुलीप ट्राॅफी खेळताना दिसणार आहेत. पण बांगलादेशविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यापूर्वी रोहित सेनेला काही गोष्टी सुधाराव्या लागणार आहेत. कारण श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत ज्या चुका भारतीय संघाकडून झाल्या त्या चुका बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत झाल्या तर भारतीय संघाचं मोठं नुकसानं होण्याची शक्यता आहे.
1) भारतीय संघाला ज्या खेळपट्टीवर चेंडू फिरतो त्या खेळपट्टीचा पूर्णपणे अभ्सास करावा लागणार आहे. कारण श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताचा एकही फलंदाज फिरकीपटूंविरुद्ध खेळपट्टीवर जास्त वेळ टिकू शकला नाही. विराट कोहली, रोहित शर्मा, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा हे खेळाडू फिरकीपटूंविरुद्ध चमकदार कामगिरी करु शकतात. पण त्यांना खेळपट्टीवर फिरकीपटूंविरुद्ध जास्त सराव करण्याची गरज आहे.
2) भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) हे खेळाडू सोडून भारतीय संघातील अन्य खेळाडूंना देखील संघासाठी धावा कराव्या लागणार आहेत. कारण जर हे दोन दिग्गज खेळाडू लवकर बाद होऊन तंबूत परतले तर भारतीय संघाच्या फलंदाजीची कंबर मोडलेली दिसून येते. तर इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटी मालिकेत शुबमन गिल (Shubman Gill) आणि यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) दोन्ही फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
विनेशला रौप्य पदकासाठी करावी लागणार प्रतिक्षा, ‘या’ दिवशी होणार निर्णय
दिग्गज क्रिकेटरचा नोकरीसाठी क्रिकेटला रामराम, 30 शतके आणि 16 हजारांहून अधिक धावा आहेत नावावर
“बचावात्मक होण्यापेक्षा अपयशी होणे चांगले”, भारतासाठी 744 विकेट्स घेणाऱ्या अश्विनचे विधान