---Advertisement---

शॉन पोलॉकबरोबर ४ वर्षांच्या मार्नस लॅब्यूशेनच्या ‘त्या’ फोटोमागील एक मनोरंजक कथा, घ्या जाणून

On: सोमवार, जानेवारी 25, 2021 9:45 AM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये सध्या स्टार क्रिकेटपटूंमध्ये गाजणारे एक नाव म्हणजे मार्नस लॅब्युशेन. सुरुवातीला त्याच्या नावामुळे चर्चेत आलेल्या लॅब्यूशेनने काही कालावधीतच त्याच्या कामगिरीमुळे त्याची दखल सर्वांना घ्यायला लावली. लॅब्यूशेन आत्ता जरी ऑस्ट्रेलियाकडून खेळत असला तो मुळचा दक्षिण आफ्रिकेतील आहे.

२२ जून १९९४ साली क्लर्कडॉर्प, दक्षिण आफ्रिका येथे जन्मलेल्या लॅब्यूशेनचा कल लहानपणापासून क्रिकेटकडे होता. याचाच प्रत्यय सध्या एका फोटोवरुन येत आहे. त्याचा ४ वर्षांचा असाताना शॉन पोलॉकबरोबर काढलेला एक फोटो सध्या व्हायरल होत आहे.

या फोटोबद्दल दिग्गज सांख्यिकीतज्ञ मोहन दास मेनन यांनी त्यांच्या ट्विटरवरुन माहिती दिली आहे की ‘४ वर्षांचा मार्नस लॅब्यूशेनचा दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज गोलंदाज शॉन पोलाकबरोबरचा हा फोटो १३ एप्रिल १९९७ ला ब्लोएमफॉन्टेन येथे झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे सामन्याआधी काढलेला आहे. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक असलेले बॉब वूल्मर म्हणाले होते, ‘लहान मुला, आम्हाला तुझ्याबरोबर करार करायचा आहे.’ त्यावेळी मार्नस नेटजवळ उभा होता.’ आज दक्षिण आफ्रिकेला वाटत असावे की तो करार व्हायला पाहिजे होता.’

विशेष म्हणजे आता जवळपास २३ वर्षांनंतर तोच मार्नस लॅब्यूशेन ऑस्ट्रेलिया संघासाठी शानदार कामगिरी करत आहे. हे पाहून द ऑस्ट्रेलियनने दिलेल्या वृत्तानुसार शॉन पोलाक यांनी गमतीने म्हटले आहे की त्यांनीच लॅब्यूशेनला सर्वकाही शिकवले आहे. पोलॉक देखील सध्या त्याची कामगिरी पाहून प्रभावित झाले आहेत.

लहानपणी ऑस्ट्रेलियात स्थायिक –

लॅब्यूशेन १०-१२ वर्षांचा असतानाच त्याच्या आई-वडीलांसह ऑस्ट्रेलियाला गेला आणि तिथे त्याचे कुटुंब स्थायिक झाले. त्यावेळी ब्रिस्बेनमध्ये शाळेत असताना लॅब्यूशेनला नीट इंग्लिश बोलताही येत नव्हते. पण हळुहळू तो त्या वातावरणात रमला. त्याने पुढे साऊथ ऑस्ट्रेलियाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळायलाही सुरुवात केली.

लॅब्यूशेनने आत्तापर्यंत १८ कसोटी सामने खेळले असून यात ६०.८० च्या सरासरीने १८८५ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ५ शतकांचा आणि १० अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने १२ विकेट्सही घेतल्या आहेत. याशिवाय त्याने १३ वनडे सामने खेळले असून ३९.४१ च्या सरासरीने १ शतक आणि ३ अर्धशतकासह ४७३ धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

वाढदिवस विशेष: टीम इंडियाची माॅडर्न एराची भिंत, चेतेश्वर पुजारा!

एका कसोटी डावात एकाच गोलंदाजाचे तब्बल ५ झेल, फक्त ‘या’ खेळाडूने केलीय ही खास कामगिरी

Video : इंग्लंड-श्रीलंका कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दिसला ‘सरडा’, आयसीसीनेही घेतली दखल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---