वेस्ट इंडीज विरूध्द श्रीलंका य़ांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन येथील मैदानावरून सुरूवात झाली.
यजमानांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. क्रेग ब्रेथवेट- डेवोन स्मिथ हि सलामीला आलेली जोडी संघाला चांगली सुरूवात करुन देण्यात अपयशी ठरली.
४ धावा फलकावर लागल्या असताना ब्रेथवेट ड्राइव्ह करण्याच्या प्रयत्नात लकमलच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक डिकवेलाकडे झेल देऊन बाद झाला.
शाय होपने गमागेला चौकार लगावत कसोटीतील वैयक्तिक १००० धावांचा टप्पा ओलांडला.
२१ वर्षीय जलदगती गोलंदाज लहिरू कुमारने तीन बळी मिळवले यात त्याने कायरन पॉवेल आणि जेसन होल्डर हे महत्वाचे बळी मिळवले. लकमल आणि हेराथ यांनी प्रत्येकी १-१ बळी मिळवला.





