भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि सचिन तेंडुलकर याचा सहकारी अशी ओळख असणारा विनोद कांबळी सध्या चुकीच्या मार्गावर असल्याचे दिसते. कांबळी मागच्या काही वर्षांमध्ये अनेकदा दारुच्या नशेत राडे करताना दिसला आहे. आता कांबळीची पत्नी अँड्रिया हिने देखील त्याच्यावर दारुच्या नशेत मारहाण केल्याचे आरोप केले आहेत. वांद्रे पोलीस ठाण्यात अँड्रियाने पतीकडून मारहाण होत असल्याची तक्रार केली होती आणि पोलिसांनी कांबळीवर गुन्हा देखील दाखल केला आहे.
विनोद कांबळी (Vinod Kambli) भारतीय संघाचा एकेकाळचा धडाडीचा फलंदाज होता. त्याने भारतीय संघासाठी आतापर्यंत 17 कसोटी आणि 104 वनडे सामने खेळले आहेत. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि कांबळी याच्या मैत्रीचे किस्से चांगलेच लोकप्रिय आहेत. पण सचिन पुढे जाऊन भारतीय संघाचा महान फलंदाज बनला आणि कांबळी मात्र त्याची कारकिर्द जास्त पुढे घेऊन जाऊ शकला नाही. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर कांबळी समालोचकाच्या भूमिकेतही दिसला. सध्या मात्र तो प्रचंड आर्थिक अडचणीत असल्याचे सांगितले जाते. त्याला अनेकदा दारूच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी राडा करतानाही पाहिले गेले आहे.
कांबळीच्या पत्नीने त्याच्यावर आरोप केला आहे की, दारू पिऊन त्याने मारहाण आणि शिवीगाळ केली. तक्रार मिळाल्यानंतर वांद्रे पोलिसांनी दंडविधानातील कलम 324 आणि 504 अंतर्गत गुन्हा नोंदवून घेतला. विनोदने कुकिंग पॅन फेकून मारल्याचा आरोप देखील अँड्रिया (Andrea) हिने केला आहे. या घटनेनंतर अँड्रियाच्या डोक्याला जखम झाली आहे. हे कृत्य करताना कांबळी दारूच्याच नशेत होता असा दावा केला जात आहे. वांद्रा येथील एका फ्लॅटमध्ये सध्या कांबळी कुटुंब राहत असून राहत्या घरी हा प्रकार घडलाच्या माहिती मिळाली आहे.
पत्नीला मारहाण करणाऱ्या या भारतीय क्रिकेटपटूला त्याचा 12 वर्षीय मुलगा देखील पाहत होता. कोणत्याही पालकांसाठी ही निंदनीय बाब म्हणता येऊ शकते. आईला मारहाण करणाऱ्या वडिलांना रोकण्यासाठी त्यांच्या 12 वर्षीय मुलाने प्रयत्न केला, पण हे पाहून कांबळींनी कुकिंग पॅन फेकून मारला. दरम्यान, या घटनेनंतर विनोद कांबळी यांच्या पत्नीवर उपचार केले गेल्याची माहिती पोलिंसांकडून दिली गेली आहे. (A case has been filed against Vinod Kambli by his wife Andrea)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘प्रोपगंडा बंद करा, आमचं त्याच्यावर प्रेम आहे’, टिळा न लावून घेण्याच्या वादावर उमरानचा नवीन फोटो व्हायरल
जगातील सर्वात यशस्वी फ्रँचायझी असलेल्या मुंबईच्या मांडीला मांडी लावून बसला ‘हा’ ऑस्ट्रेलियन संघ, वाचाच