---Advertisement---

जगातील सर्वात यशस्वी फ्रँचायझी असलेल्या मुंबईच्या मांडीला मांडी लावून बसला ‘हा’ ऑस्ट्रेलियन संघ, वाचाच

On: शनिवार, फेब्रुवारी 4, 2023 10:41 PM
Mumbai Indians And Perth Scorchers
---Advertisement---

शनिवारी (दि. 4 फेब्रुवारी) पर्थ येथे ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यात आला. या सामन्यात पर्थ स्कॉर्चर्स विरुद्ध ब्रिस्बेन हीट हे संघ आमने-सामने होते. शेवटच्या षटकापर्यंत चाललेल्या या सामन्यात पर्थ संघाने 5 विकेट्सने विजय मिळवला. तसेच, बीबीएलचे विजेतेपदही पटकावले. या सामन्यातील कामगिरीसाठी ऍश्टन टर्नर याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, हे विजेतेपद पटकावताच पर्थ संघाच्या नावावर खास विक्रमही नोंदवला गेला.

सामन्याचा आढावा
पर्थ स्कॉर्चर्स विरुद्ध ब्रिस्बेन हीट (Perth Scorchers vs Brisbane Heat) संघातील अंतिम सामन्यातील नाणेफेकीचा निकाल ब्रिस्बेनच्या बाजूने लागला होता. यावेळी ब्रिस्बेन संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी निर्धारित 20 षटकात 7 विकेट्स गमावत 175 धावा कुटल्या. हे आव्हान पर्थ संघाने 19.2 षटकात 5 विकेट्स गमावत खिशात घातला. यासह पर्थ संघाने खास विक्रमही रचला. तो विक्रम असा की, पर्थने बिग बॅश लीग (Big Bash League) स्पर्धेच्या 12 व्या हंगामातील 5वा किताब नावावर केला. अशाप्रकारे जगभरातील टी20 लीगमध्ये सर्वाधिक यशस्वीरीत्या किताब पटकावणाऱ्या फ्रँचायझींमध्ये पर्थ स्कॉर्चर्स (Perth Scorchers) संघाच्या नावाचाही समावेश झाला.

https://twitter.com/BBL/status/1621857065781309440

सर्वाधिक यशस्वी फ्रँचायझी
बीबीएलमध्ये सर्वाधिक वेळा किताब पटकावत पर्थ संघ सर्वात यशस्वी फ्रँचायझी बनला. मात्र, जगभरातील इतर देशांमध्ये अशा कोणत्या यशस्वी फ्रँचायझी आहेत, ते जाणून घेऊया…

भारतातील इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) ही सर्वात यशस्वी फ्रँचायझी आहे. या संघाने आतापर्यंत तब्बल 5 वेळा आयपीएलचा किताब नावावर केला आहे. मुंबई आणि पर्थ हे संघ सर्वात यशस्वी फ्रँचायझींच्या यादीत संयुक्तरीत्या पहिल्या क्रमांकावर आले आहेत. याव्यतिरिक्त दुसऱ्या स्थानी कॅरिबियन प्रीमिअर लीगमध्ये त्रिनबॅगो नाईट रायडर्स (Trinbago Knight Riders) ही सर्वात यशस्वी फ्रँचायझी आहे. त्रिनबॅगोने आतापर्यंत 4 वेळा स्पर्धेचा किताब नावावर केला आहे. यादीत संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानी तीन संघ आहेत. त्यात बांगलादेश प्रीमिअर लीगमधील ढाका डॉमिनेटर्स, कॉमिला व्हिक्टोरियन्स आणि लंका प्रीमिअर लीगमध्ये जाफना किंग्स या संघाचा समावेश आहे. या तीन संघांनी प्रत्येकी 3 वेळा स्पर्धेचा किताब पटकावला आहे. (Most successful franchises in their countries T20 leagues)

त्या-त्या देशातील टी20 लीगमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझी-
5 वेळा- मुंबई इंडियन्स (आयपीएल)
5 वेळा- पर्थ स्कॉर्चर्स (बीबीएल)*
4 वेळा- त्रिनबॅगो नाईट रायडर्स (सीपीएल)
3 वेळा- ढाका डॉमिनेटर्स (बीपीएल)
3 वेळा- कॉमिला व्हिक्टोरियन्स (बीपीएल)
3 वेळा- जाफना किंग्स (एलपीएल)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये 12 खेळाडूंनी केलीय ‘ही’ कामगिरी, धोनी वगळता यादीत 7 भारतीयांचा समावेश
ब्रेकिंग! मुंबई इंडियन्सला चॅम्पियन बनवणाऱ्या खेळाडूने घेतली निवृत्ती, पोस्ट शेअर करत दिली माहिती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---