येत्या 9 फेब्रुवारीपासून नागपूर येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय संघाचे स्टार खेळाडू मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक यांना टीकेचा सामना करावा लागला. शनिवारी (दि. 4 फेब्रुवारी) सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओत दोन खेळाडू हॉटेलमध्ये टिळा लावण्यास नकार देताना दिसत आहेत. यानंतर दोघांनाही नेटकऱ्यांनी धारेवर धरलं, तर काहींनी त्यांना पाठिंबाही दिला.
अशातच आता सोशल मीडियावर एक फोटो जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोत हॉटेलमध्ये उमरान मलिक टिळा (Umran Malik Tilak) लावताना दिसत आहे. सोशल मीडियावर भारतीय चाहत्यांकडून हा फोटो शेअर केला जात आहे. चाहते म्हणत आहेत की, “प्रोपगंडा बंद करा, आमचं उमरान मलिकवर प्रेम आहे.” त्यांनी उमरानच्या टीकाकारांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. शनिवारी जो व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यामध्ये त्याच्याव्यतिरिक्त फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनीही टिळा लावण्यास नकार दिला होता. त्यांच्याव्यतिरिक्त संघातील इतर सदस्यांनीही टिळा लावण्यास नाकारले होते.
Nonsensical propaganda band karo, we love Umran Malik 🇮🇳 pic.twitter.com/w9yTrAcJ1n
— Sushant Mehta (@SushantNMehta) February 4, 2023
इसे शेयर नहीं करेंगे बस #UmranMalik #siraj pic.twitter.com/E01MUjSOev
— Rajat Gupta (@Rajatgupta199) February 4, 2023
संपूर्ण प्रकरण आहे तरी काय?
भारतीय संघाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये संघातील सर्व सदस्य हॉटेलमध्ये जाताना दिसत आहेत. यादरम्यान हॉटेलचे कर्मचारी खेळाडूंना टिळा लावत त्यांचे स्वागत करत आहेत. मात्र, संघातील काही सदस्य टिळा लावण्यास नकार देतात. व्हिडिओत दिसते की, उमरान मलिक (Umran Malik), मोहम्मद सिराज (Mohammed Siraj), विक्रम राठोड (Vikram Rathour) आणि हरि प्रसाद मोहन हे टिळा लावण्यास नकार देतात. मात्र, संघातील इतर सदस्य टिळा लावतात आणि काही सदस्य त्यांचा चष्मा काढून टिळा लावतानाही दिसतात.
नेमका वाद आहे तरी काय?
टीकाकारांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. त्यांचे म्हणणे आहे की, उमरान आणि सिराज हे त्यांच्या धर्माबाबत खूपच कट्टर आहेत. त्यामुळे त्यांनी टिळा लावण्यास नकार दिला. मात्र, दोघांनाही त्यांच्या चाहत्यांकडून समर्थन मिळाले आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित करत लिहिले आहे की, विक्रम राठोड आणि हरि प्रसाद यांनीही टिळा लावला नाहीये, त्यांच्यावर कुणी वक्तव्य का करत नाहीये?
Vikram Rathour & Hari Prasad Mohan didn't apply tilak too. But @SureshChavhanke & other Right wing accounts want you to focus Muslim players Umran Malik & Mohammed Siraj. https://t.co/twbMex2j4o pic.twitter.com/U96VSDp4bp
— Mohammed Zubair (@zoo_bear) February 3, 2023
https://twitter.com/HarshaObviously/status/1621859853697437698
ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा
ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध 4 कसोटी आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. यातील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाने आधीच संघाची घोषणा केली आहे. तसेच, चाहते आता कसोटी सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. (ind vs aus test new picture surfaced after umran malik controversy over avoiding tilak in hotel see here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जगातील सर्वात यशस्वी फ्रँचायझी असलेल्या मुंबईच्या मांडीला मांडी लावून बसला ‘हा’ ऑस्ट्रेलियन संघ, वाचाच
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये 12 खेळाडूंनी केलीय ‘ही’ कामगिरी, धोनी वगळता यादीत 7 भारतीयांचा समावेश