मुंबई इंडियन्सने आयपीएल 2023मध्ये कॅमरून ग्रीन याच्यासाठी तब्बल 17.50 कोटी रुपये खर्च केले. रविवारी (21 मे) ग्रीन या पैशांच्या तुलनेत मुंबई इंडियन्ससाठी प्रदर्शन करू शकला. लीग स्टेजचा आपला शेवटचा सामना मुंबईने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 8 विकेट्सने जिंकला. या विजयात ग्रीनचे शतक महत्वाचे ठरले. याच पार्श्वभूमीवर माजी ऑस्ट्रेलियन दिग्गज टॉम मुडी यांनी ग्रीनचे कौतुक कले.
कॅमरून ग्रीन आयपीएल 2023 (IPL 2023) मधील दुसरा सर्वात महागडा खेळाडू राहिला आहे. याच कारणास्तव संघासाठी चांगले प्रदर्शन करण्याचा दबावही त्याच्यावर होता. ग्रीनने रविवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्द 47 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या आणि हा दबाव देखील संपवला. हंगामातील 14 सामन्यांमध्ये ग्रीनने 381 धावा केल्या आहेत. यात 2 अर्धशतक आणि एक शतक सामील आहेत. हैदराबादविरुद्धचा सामना मुंबईसाठी ‘करो या मरो’ असा होता. ग्रीन आपल्या संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर आला आहे महत्वपूर्ण शतक ठोकले. परिणामी मुंबईने 18 षटकांमध्येच विजय मिळवला.
ग्रीनचे या सामन्यातील प्रदर्शन पाहून ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज टॉम मुडी (Tom Moody) यांनी त्याचे कौतुक केले. मुडींच्या मते ग्रीन आपल्यावर अललेल्या दबावाला चांगल्या पद्धतीने सामोरे गेला आहे. ते म्हणाले, “23 वर्षीय खेळाडूने आपल्याला मिळालेल्या पैशांच्या दबावाला चांगल्या पद्धतीने हाताळले आहे. मुंबई इंडियन्ससोबत आपल्या कारकिर्दीची चांगली सुरुवात कॅमरून ग्रीनने केली आहे. त्याचे मानसीक संतुलन चांगले आहेच. पण त्याचसोबत खेळण्याची शैली आणि पद्धतही अप्रतिम आहे.”
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादसाठी मयंक अगरवाल चांगला खेळला. अगरवालने या सामन्यात 46 चेंडूत 83 धावांची खेली केली. याच पार्श्वभूमीवर टॉम मुडी यांनी मयंकचेही कौतुक केले. मुडी म्हणाले, “त्याने दाखवून दिले की, तो काय करू शकतो. जेव्हा तो केएल राहुलसोबत डावाची सुरुवात करायचा, तेव्हा दोघे मिळून विरोधी संघावर प्रभाव पाडत असायचे. तो एक अप्रतिम खेळाडू आहे.” (A century against Hyderabad is an important milestone in Cameron Green’s IPL career! Kudos from a former Australian legend)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मागील पराभवाचा वचपा मुंबई Eliminator सामन्यात काढणार? वाचा कशी असेल खेळपट्टी अन् संभावित प्लेइंग इलेव्हन
आर्चरच्या दुखापतीमुळे सहकाऱ्याच्या डोळ्यात पाणी, ऍशेसमधून माघार घेतल्यानंतर संघाला मोठा धक्का