भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीचे चाहते जगभरात आहेत. दिवसेंदिवस माहीच्या चाहत्यांमध्ये भर होत आहे. कॅप्टन कुलची क्रेझ लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत दिसून येते. माहीचे चाहते त्याच्यासाठी चित्र काढतात तर कधी त्याच्यावर गाणी लिहीतात, काहीजण तर भले मोठे टॅटू सु्द्धा गोंदवून घेतात. मात्र, धोनीच्या एका चाहत्याने कहरच केला म्हणावं लागेल. त्या पठ्ठ्याने त्याच्या लग्न पत्रिकेवर आक्षरश: धोनीचा फोटो छापून घेतला आहे. तर चला जाणून घेऊ हा चाहता आहे तरी कोण.
सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोमधील खास गोष्ट म्हणजे कॅप्टन कुलच्या एका चाहत्याने लग्न पत्रिकेवर स्वत:च्या फोटो ऐवजी एमएस धोनीचा फोटो छापला आहे. धोनीच्या फोटोसोबत त्याचा जर्सी नंबर आणि नाव देखील छापण्यात आले आहे. इंटरनेटवर व्हायरल होत असलेली ही लग्न पत्रिका (Wedding Card) छत्तीसगड मधील रायगढ जिल्ह्यामधील असल्याचे दिसून येते.
या लग्नपत्रिकेच्या दोन्ही बाजूला चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचा कर्णधार एमएस धोनीचा फोटो छापला आहे. यासोबतच धोनीच्या जर्सीचा नंबर ‘7’ आणि ‘थाला’ असे नाव दिसून येते. माहीच्या या चाहत्याचे नाव दिपक पटेल असून तो मिलुपाराच्या कोंडकेल जिल्ह्यामधील रहिवासी आहे. दिपकला विचारले असता तो म्हणाला की, “त्याच्या बालपणीच्या दिवसांपासून तो एमएस धोनीला आपला आदर्श मानतो आणि त्यामुळे त्याचे क्रिकेटवर प्रेम आहे.” (Fans Cricket Love)
क्रिकेटवरील प्रेम फक्त धोनीमुळे
पुढे बोलताना दिपक म्हणाला की, “एमएस धोनीमुळे माझे क्रिकेटवरील प्रेम वाढले, आणि अजुन पर्यंत ते शाश्वत आहे.” तसेच, त्याने सांगितले की, “तो गावातील क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. धोनीला खेळताना बघून मी कर्णधारपद शिकले. मी लग्न पत्रिकेवर छापलेला माहीचा फोटो हा लोकप्रियतेसाठी नाही तर, मी मना पासून त्याचा आदर करतो.”
धोनीच्या नेतृत्वामध्ये सीएसकेने पाचव्यांदा विचजेतेपद पटकावले
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वामध्ये संघाने पाचव्यांदा विचजेतेपद पटकावले आहे. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्धच्या अंतिम सामन्यावेळी (IPL Final) सीएसकेला जिंकण्यासाठी 15 षटकांत 171 धावांचे लक्ष्य पार करायचे होते. धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने शेवटच्या चेंडूवर सामना आपल्या नावावर केला. या हंगामामध्ये धोनीच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. मात्र, तो संघासाठी आणि चाहत्यांसाठी चमकदार कामगिरी करताना दिसून दिसून आला. याच कारणामुळे कायम धोनीने त्याच्या चाहत्यांची मने जिंकली आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
बेन स्टोक्सने रचला इतिहास! बनला 146 वर्षांच्या कसोटी क्रिकेटमध्ये ‘असा’ पराक्रम करणारा पहिलाच कॅप्टन
‘तुझ्या नोटांपेक्षा जास्त माझे…’, सेहवागचा ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ अख्तरवर तिखट मारा