आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सने आपला अखेरचा सामना सनरायझर्स हैदराबादविरूद्ध खेळला. आपल्या घरच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे मुंबईला प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी प्राप्त झाली. आपले होम ग्राउंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर मुंबईने विजयी अखेर केल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी आपल्या चाहत्यांचे धन्यवाद मानले.
मुंबई इंडियन्स संघासाठी या हंगामाची सुरुवात चांगली झाली नव्हती. मोठ्या अपेक्षा घेऊन स्पर्धेत सहभागी झालेल्या मुंबईला पहिल्या दोन्ही सामन्यात पराभव पत्करावा लागला. मात्र, त्यानंतर त्यांनी विजयी लय प्राप्त केली. त्यांनी सलग तीन विजय मिळवले. त्यानंतरही विजय पराभव असा खेळ सुरू राहिला. अखेरीस त्यांना आपल्या प्ले ऑफ प्रवेशासाठी आरसीबीच्या पराभवावर अवलंबून राहावे लागले. आरसीबीचा घरच्या सामन्यात पराभव झाल्याने मुंबईने 16 गुणांसह प्ले ऑफ्ससाठी पात्रता मिळवली.
A lap of honour by Mumbai Indians for the support of the Wankhede crowd. pic.twitter.com/sRrtH0iUpz
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 22, 2023
मुंबईने हंगामात आपल्या घरच्या मैदानावर सात सामने खेळले. त्यापैकी केवळ एकच सामना त्यांनी गमावला. चेन्नई विरुद्ध त्यांना पराभवाचे तोंड पहावे लागलेले. या हंगामात घरच्या मैदानावर सर्वाधिक सामने जिंकण्याची कामगिरी देखील मुंबईनेच केली. विशेष म्हणजे मुंबईने या मैदानावर तीन वेळा 200 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग केला.
वानखेडे स्टेडियमवर आपल्याला मिळालेल्या या पाठिंब्याबद्दल त्यांनी मुंबईच्या चाहत्यांचे विशेष आभार मानले. हैदराबादविरुद्ध सामना जिंकल्यानंतर त्यांनी प्रेक्षकांचे अभिवादन करण्यासाठी संपूर्ण मैदानाला फेरी मारली. यामध्ये संघाचा आयकॉन तसेच भारताचा सर्वकालीन महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा देखील सहभागी झाला. कर्णधार रोहित शर्मा व संपूर्ण संघ चाहत्यांचे धन्यवाद मानताना दिसून आला.
मुंबई इंडियन्स आता एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपरजायंट्सचा सामना करेल. चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर हा सामना होणार आहे. हा सामना जिंकल्यानंतर पुन्हा क्वालिफायर 2 विजेत्या संघाला खेळावा लागेल.
(A lap of honour by Mumbai Indians for the support of the Wankhede crowd Sachin Rohit Included)