मागील दोन वर्षापासून मर्यादीत षटकांच्या क्रिकेटसाठी भारतीय संघाचा अविभाज्य भाग बनलेला अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या कसोटी पदार्पणाला गुरुवारी (26 जुलै) एक वर्ष पूर्ण झाले.
याबद्दल त्याने इंस्टाग्रामवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने त्याच्या एका कसोटी सामन्यातील फोटो शेअर केला आहे आणि त्याला कॅप्शन दिले आहे की, “मागील वर्षी या दिवशी माझे कसोटी पदार्पण झाले होते. आत्तापर्यंतचा हा एक संस्मरणीय अनुभव आहे.”
त्याच्या या पोस्टवर त्याच्या अनेक चाहत्यांनी शुभेच्छांचे कमेंट केल्या आहेत.
https://www.instagram.com/p/Blr-VgMBuqV/?taken-by=hardikpandya93
पंड्याने श्रीलंकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्याने आत्तापर्यंत 7 कसोटी सामने खेळले असुन यात 36.80 च्या सरासरीने 368 धावा केल्या आहेत. तसेच 40.14 च्या सरासरीने 7 विकेट्स घेतल्या आहेत.
त्याचबरोबर पंड्याची 1 आॅगस्टपासून सुरु होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. ही मालिका सुरु होण्याआधी भारताचा एसेक्स संघाशी 25 ते 27 जुलै दरम्यान सराव सामना पार पडला.
या सामन्यात हार्दिकने अर्धशतक केले. त्याने 82 चेंडूत 51 धावा केल्या. मात्र त्याला विकेट घेण्यात अपयश आले.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–टीम इंडियाच्या या महिला क्रिकेटर्सने दिली यो यो टेस्ट
–दोन महिने आधीच बंगालने केला रणजी संघाचा कर्णधार घोषीत
–क्रिकेटचा प्रचार करण्यासाठी जपानची ही अनोखी कल्पना