भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीविरुद्ध मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याच्यासह बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया विरुद्धही याचिका दाखल झाली असून त्यांना अटक करण्यात यावी असे म्हटले आहे. त्यांच्यावर ऑनलाईन सट्टेबाजीचा प्रचार केल्याचा आरोप आहे.
टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार चेन्नई येथील एका वकिलांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्याने मद्रास उच्च न्यायालयाला सांगितले आहे की ऑनलाईन सट्टेबाजीच्या ऍप्सवर वर बंदी घालण्याच्या सूचना जारी कराव्यात कारण त्याचा युवा पिढीवर वाईट परिणाम होत आहे.
याचिकेत पुढे म्हटले आहे की ऑनलाईन सट्टेबाजी करणार्या कंपन्या विराट कोहली आणि तमन्ना सारख्या स्टार्सचा वापर करत युवा पिढीच्या मनावर वाईट परिणाम घडवून आणत आहेत आणि म्हणूनच दोघांना अटक केली पाहिजे. याचिकाकर्त्याने ऑनलाईन सट्टेबाजीमध्ये घेतलेल्या पैशाची परतफेड करता येत नसल्यामुळे आत्महत्या केलेल्या एका तरूणाबद्दलही नमूद केले. याचिकाकर्त्याने असेही म्हटले आहे की या ऑनलाइन सट्टेबाजी साइट्सवर तरुण जास्त व्याजदराने पैसे घेतात आणि नफा मिळविण्यास अपयश आले की आत्महत्या करतात. या याचिकेवर मंगळवारी, ४ ऑगस्टला सुनावणी होणार आहे.
विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया दोघेही मोबाइल प्रीमियर लीगची जाहिरात करतात. कोहली आणि तमन्ना दोघेही गेमिंग प्लॅटफॉर्मचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. तसेच त्यांचे सोशल मीडियावरही बरेच फॉलोवर्स आहेत. विराट नुकताच इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोवर्स असणारा जगातील चौथ्या क्रमांकाचा खेळाडू बनला आहे.
सध्या कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत विराट त्याची पत्नी अनुष्का शर्मासह मुंबईमध्ये त्यांच्या घरी आहे. या दरम्यान तो काही लाईव्ह चॅटमध्ये दिसून आला आहे. तसेच त्याने या काळात गरजू लोकांना मदतही केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मयंक-रोहित नाही तर ही आहे सध्याची सर्वोत्तम सलामी जोडी, भारताच्या ह्या माजी क्रिकेटरचे मत
पाँटिंग आणि धोनी या दोघांत सर्वोत्तम कर्णधार कोण? आफ्रिदीने दिले ‘हे’ उत्तर
८ नोव्हेंबर नाही तर या दिवशी होऊ शकते आयपीएल२०२० ची फायनल
ट्रेंडिंग लेख –
क्रिकेटवर बनलेल्या या २ जबरदस्त बॉलिवूड चित्रपटांना दुर्लक्ष करुन चालणार नाही
आयपीएल २०२०: ‘या’ ३ कारणांमुळे विराटचा आरसीबी संघ यंदा जिंकू शकतो आयपीएल ट्रॉफी