---Advertisement---

पाँटिंग आणि धोनी या दोघांत सर्वोत्तम कर्णधार कोण? आफ्रिदीने दिले ‘हे’ उत्तर

---Advertisement---

मुंबई । पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी अनेकदा भारताविरूद्ध वादग्रस्त वक्तव्ये करून नेहमीच चर्चेत राहतो. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना तो अजिबात आवडत नाही. अलीकडेच त्यांनी काश्मीर प्रश्नावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात टिका केली होती. पण नुकतीच आफ्रिदीने सोशल मीडियावर एक अशी प्रतिक्रिया दिली आहे,ज्याने भारतीय चाहत्यांची मने जिंकली आहेत.

शाहिद आफ्रिदीने बुधवारी ट्विटरवर चाहत्यांसमवेत प्रश्नोत्तराचे सत्र केले. या सत्रात चाहत्यांनी आफ्रिदीला अनेक प्रश्न विचारले. एका चाहत्याने आफ्रिदीला विचारले की, पाँटिंग आणि धोनी या दोघांत सर्वोत्तम कर्णधार कोण आहे? यावेळी शाहिद आफ्रिदीने धोनी पाँटिंगपेक्षा चांगला कर्णधार असल्याचे सांगितले. आफ्रिदी म्हणाला की, “धोनीने संघाला उभे केले, म्हणूनच मी त्याला पाँटिंगपेक्षा चांगला कर्णधार मानतो.”

आफ्रिदीने धोनीचे कौतुक करण्याची ही पहिली वेळ नाही. धोनी कर्णधार होण्याआधीपासून तो त्याचे कौतुक करतोय. 2014 मध्ये तो म्हणाला होता, ”धोनी संघात चांगले कॉम्बिनेशन ठेवत असतो. तो सर्वोत्तम कर्णधार आहे.”

शाहिद आफ्रिदीसमवेत प्रश्नोत्तराच्या सत्रात आणखी प्रश्न विचारले गेले. आफ्रिदीला त्याचा आवडता भारतीय फलंदाज विचारले असता त्याने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची नावे घेतली. त्याने वसीम अक्रम व पॅट कमिन्स यांना सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज असल्याचे सांगितले. ब्रायन लारा आणि एबी डिव्हिलियर्सला गोलंदाजी करायला आवडते, असेही तो म्हणाला. आफ्रिदीला त्याच्या संघातील सर्वोत्कृष्ट फलंदाजाचे नाव विचारले असता त्यांने सईद अन्वरचे नाव घेतले.

शाहीद आफ्रिदी आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून कोरोना व्हायरसने ग्रस्त झालेल्या लोकांना मदत देत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून तो लोकांना रेशन आणि कपड्याचे वाटप करत आहे. हे काम करत असताना त्याचा कोरोना बाधित लोकांशी संपर्क आला. त्यामुळे त्यालाही कोरोन‍ाची लागण झाली. त्याच्या दोन मुलींना देखील कोरोनाची बाधा झाली होती मात्र या महामारीतून तो आणि त्याच्या मुली सही सलामत सुटल्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

८ नोव्हेंबर नाही तर या दिवशी होऊ शकते आयपीएल२०२० ची फायनल

उमर अकमलची बंदी कमी करण्याबद्दल भडकला त्याचाच संघसहकारी, म्हणाला…

आयपीएल जगातली सर्वात मोठी क्रिकेट लीग, पाकिस्तानच्या या माजी खेळाडूने केले कौतुक

ट्रेंडिंग लेख –

आयपीएल २०२०: असे ३ परदेशी खेळाडू, ज्यांचा फॉर्म ठरेल त्यांच्या संघासाठी सर्वाधिक फायद्याचा

क्रिकेटच जीव की प्राण: कुटुंबातील सुख-दु:खाच्या क्षणांना बाजूला ठेवत क्रिकेटला प्राधान्य देणारे १० खेळाडू

आपल्या देशासाठी जखम झालेलं स्वत:चं बोट कापायलाही तयार झालेला क्रिकेटर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---