हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) 2022-23 हंगामातील मॅचवीक 13 सामन्यामध्ये शुक्रवारी (30 डिसेंबर) ईस्ट बंगाल एफसीने अप्रतिम खेळ करताना बंगळूरू एफसीला घरच्या मैदानावर 2-1 असे हरवले आणि प्ले-ऑफ फेरीच्या आशा कायम ठेवल्या. क्लेईटन सिल्वाने दोन्ही गोल करताना विजयात मोलाचा वाटा उचलला.
विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर फुटबॉल चाहत्यांना चुरशीची लढत पाहायला मिळाली. पूर्वार्धात मिळालेल्या पेनल्टीच्या जोरावर 38व्या मिनिटाला क्लेईटन सिल्वा याने पाहुण्यांना आघाडी घेतली. यजमानांनी दुसर्या सत्रात खेळ उंचावला. त्याचे फलस्वरूप जॅव्हियर हर्नांडेझ याने रॉय क्रिश्नाच्या 1-1 अशी बरोबरी साधली. सामना बरोबरीत सुटणार, असे वाटत असताना इंज्युरी टाइममध्ये सिल्वा पुन्हा संघाच्या मदतीला धावला. या निसटत्या विजयासह ईस्ट बंगालने सलग दोन पराभवांची मालिका खंडित केली. 11 सामन्यांतून 4 विजयांसह यांनी गुणसंख्या 10वर नेली. बंगळूरुचा 12 सामन्यांतील हा सातवा पराभव आहे.
महान फुटबॉलपटू पेले यांना श्रद्धांजली वाहून सामन्याला सुरुवात झाली. तीन वर्ल्ड कप जिंकणारे जगातील एकमेव फुटबॉलपटू पेले यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. यंदाच्या पर्वात पहिल्या टप्प्यात ईस्ट बंगालने 1-0 अशा फरकाने बंगळुरू एफसीवर विजय मिळवला होता आणि त्याची परतफेड करण्याच्या निर्धारानेच बंगळुरूचा संघ मैदानावर उतरला. पहिल्या मिनिटापासून त्यांनी आक्रमक सुरुवात केली. दुसर्या मिनिटाला पाब्लो पेरेझ चेंडू घेऊन पेनल्टी क्षेत्रात शिरला होता, परंतु ईस्ट बंगालच्या बचावपटूंनी त्याला रोखले. प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी दोन्ही संघांना विजय महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे आज जबरदस्त खेळ अपेक्षित आहे. चौथ्या मिनिटाला यजमानांच्या लेक्स लिमाने पहिला प्रयत्न केला अन् बंगळुरूच्या लन कॉस्टाने डोकं लावून चेंडूला गोलपोस्टच्या वरची दिशा दाखवली. 11व्या मिनिटाला यजमानांकडून आणखी एक सुरेख प्रयत्न झाला, परंतु अखेरची दिशा चूकली. 14व्या मिनिटाला महेश सिंगच्या क्रॉसवर क्लेईटन सिल्वाने हेडरद्वारे ऑन टार्गेट ठेवला, पण बंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीत सिंगने तो रोखला.
The Salt Lake Stadium observed a minute's silence to honour the life and times of football icon Pelé. 🇧🇷#WeAreBFC #PeleEterno #NothingLikeIt pic.twitter.com/Pv6QC2ltyn
— Bengaluru FC (@bengalurufc) December 30, 2022
दोन्ही संघांकडून प्रयत्न होत होते, परंतु त्यांच्या खेळात रटाळपणा दिसत होता… निर्णयक्षमतेचा अभाव दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये प्रकर्षाने दिसत होता. त्यामुळेच चेंडू इथून-तिथे पास होत राहिला, गोल काही होताना दिसला नाही. 25व्या मिनिटाला रॉय कृष्णाचा ऑन टार्गेट प्रयत्न एवढा कमकुवत होता की ईस्ट बंगालचा गोलरक्षक सुवम सेनने सहज रोखला. 30व्या मिनिटाला सुहैरच्या क्रॉसवर ईस्ट बंगालचा पहिला गोल झाला असता, परंतु क्लेईटन सिल्वा चेंडूपर्यंत पोहचू शकला नाही. गोलपोस्टच्या तोंडावरून हा गोल करण्याची संधी होती. 35व्या मिनिटाला रॉय कृष्णाचा आणखी एक प्रयत्न अयशस्वी ठरला. 38व्या मिनिटाला रोशन नाओरेमच्या हँडबॉलमुळे ईस्ट बंगालला पेनल्टी मिळाली आणि क्लेईटन सिल्वाने त्यावर गोल करून 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या हाफमध्ये ईस्टं बंगालने ही आघाडी कायम राखली.
मध्यंतरानंतर ईस्ट बंगालने आक्रमकच सुरुवात केली अन् कॉर्नर मिळवला. मात्र, गोलआघाडी दुप्पट करण्यात त्यांना अपयश आले. दुसरीकडे, 55व्या मिनिटाला बरोबरी साधले. त्याचे क्रेडिट जॅव्हियर हर्नांडेझला जाते. रॉय क्रिश्नाच्या सुरेख पासवर त्याने चेंडूला अचूक गोलजाळयात धाडले. राइट विंगकडून चेंडूवर नियंत्रण मिळवत क्रिश्ना याने इव्हान गोंझालेझला चकवत पेनल्टी एरियात धडक मारताना हर्नांडेझकडे चेंडू सोपवला.
Defeat in Kolkata. #EBFCBFC #WeAreBFC pic.twitter.com/2UjAuUCl9H
— Bengaluru FC (@bengalurufc) December 30, 2022
सामना संपायला 7 मिनिटे शिल्लक असताना ईस्ट बंगालला आघाडी घेण्याची संधी चालून आली होती. मात्र, यजमानांच्या बचावफळीने त्यांचा प्रयत्न उधळून लावला. परंतु, इंज्युरी टाइममध्ये यजमानांची बचावफळी भेदण्यात क्लेईटन सिल्वाला यश आले. त्याचा लेट गोल निर्णायक ठरला.
निकाल: ईस्ट बंगाल एफसी-2(क्लेईटन सिल्वा 38व्या मिनिटाला पेनल्टी, 90व्या मिनिटाला) वि. बंगळुरू एफसी-1(जॅव्हियर हर्नांडेझ, 55व्या मिनिटाला).
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेटजगताला आदरार्थी असलेल्या ‘या’ चौघांनी सरत्या वर्षात सोडले जग
पाकिस्तानी खेळाडूचे न शोभणारे कृत्य! आधी सीमारेषेवर आपटली बॅट, नंतर मैदानाबाहेरच्या खुर्चीवरही काढला राग