---Advertisement---

भारतीय संघासाठी दुबईत खास खेळपट्टी तयार ! फलंदाजांचा जलवा की गोलंदाजांचा कहर?

On: सोमवार, फेब्रुवारी 17, 2025 4:22 PM
ind vs pak
---Advertisement---

आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात 19 फेब्रुवारीपासून होत आहे. ही स्पर्धा पाकिस्तानच्या यजमान पदाखाली खेळली जात आहे. तत्पूर्वी भारतीय संघाला हायब्रीड मॉडेल लागू केल्यामुळे भारतीय संघ आपले सगळे सामने दुबईमध्ये खेळणार आहे. भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली बांगलादेश विरुद्ध पहिला सामना खेळून स्पर्धेला सुरुवात करेल. गुरुवारी भारत आणि बांगलादेश दोन्ही संघ समोरासमोर असतील.

त्यानंतर भारतीय संघासमोर पाकिस्तानचे आव्हान असेल, भारतविरुद्ध पाकिस्तान सामना (23 फेब्रुवारी) रोजी खेळला जाणार आहे. नंतर भारतीय संघ शेवटचा ग्रुप स्टेज सामना न्यूझीलंडविरुद्ध (2 मार्च) रोजी खेळेल. भारतीय संघ आपले 3 ग्रुप सामने दुबई इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये खेळणार आहे. याशिवाय या मैदानावर पहिला सेमीफायनल सामना खेळला जाणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी दुबई मैदानावरच्या खेळपट्टीला नव्या पद्धतीने तयार करण्यात आले आहे, तसेच आता हे प्रश्न उपस्थित होत आहेत की, दुबई मैदानाची खेळपट्टी कशी असेल? या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे जाईल, की खेळपट्टी गोलंदाजांना मदत करेल? तत्पूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान खेळपट्टीची प्रकृती कशी असेल, असे सांगितले जात आहे की या मैदानावर वेगवान गोलंदाजांना खूप वेळा यश मिळाले आहे. पण या वेळेस मात्र परिस्थिती बदललेली दिसून येऊ शकते. तसेच नव्या खेळपट्टीवर वेगवान फिरकीपटूंविरुद्ध खेळणं फलंदाजांसाठी मोठं आव्हान असू शकतं.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाने 15 खेळाडूंच्या संघात पाच फिरकीपटू गोलंदाजांना स्थान दिले आहे. ज्यामध्ये रवींद्र जडेजा शिवाय अक्षर पटेल ,वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि वरूण चक्रवर्ती यांचा समावेश आहे. आता हा प्रश्न उपस्थित झाला आहे की, प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्या खेळाडूंना जागा मिळेल?

भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल खेळतीलच असा दावा केला जात आहे. याव्यतिरिक्त तिसऱ्या फिरकीपटूच्या जागी कुलदीप यादव खेळण्याची शक्यता आहे. जर भारतीय संघाच्या फिरकीपटू गोलंदाजांकडे पाहिले तर विरोधी संघाच्या फलंदाजांना अडचणी येण्याची शक्यता आहे. आता हे बघणं उत्सुकतेच असेल की दुबईच्या मैदानाची खेळपट्टी फिरकीपटू ‌गोलंदाजांना किती मदत करते?

हेही वाचा

पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! भारतीय संघाच्या सराव सत्रात चौकार-षटकारांचा पाऊस

आणखी एका दिग्गज क्रिकेटपटूचा घटस्फोट, 14 वर्षांच्या नात्याला झाला अंतिम विराम

वानखेडे स्टेडियममध्ये MI चाहत्यांसाठी मेजवानी! IPL 2025 ची संपूर्ण माहिती

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---