---Advertisement---

पाकिस्तानमध्ये स्टेडियमजवळ बॉम्बस्फोट, बाबर आझम आणि शाहिद आफ्रिदीच्या सुरक्षेसाठी थांबवला सामना

PZvsQG bomb blast
---Advertisement---

पाकिस्तानचा क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम आणि शाहिद अफ्रिदी यांच्यासह पाकिस्तानच्या काही महत्वाच्या खेळाडूंपासून जवळच्या अंतरावर आतंकवादी हल्ला झाला, असी माहिती माध्यमांमधून समोर येत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सर्व खेळाडूंनी ड्रेसिंग रूममध्ये नेले गेले आणि लाईव्ह सामना थांबवावा लागला. क्वेटा ग्लॅडिएटर्स आणि पेशावर जाल्मी यांच्यातल पाकिस्तान सुपर लीगचा एक विशेष  सामन्याचे आयोजन पीसीबीने केले होते. पण आतंकवादी हल्ल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता पूर्णपणे मावळली. 

नवाब बुगती स्टेडियपासून काहीच किलोमीटर अंतरावर अतंकवादी हल्ला झाला, ज्यामुळे स्टेडियममध्ये उपस्थित बाबर आझम (Babar Azam) आणि शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) यांच्यासह सर्वच खेळाडूंनी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. खेळाडू पीसीबीकडून आयोजित सीएसएलचा हा खास सामना खेळत होते. पण धमाका झाल्याचे समजताच त्यांना ड्रेसिंग रूममध्ये नेले गेले. कातंकवाद्यांनी केलेला हा धमाका पोलीस लाईन क्षेत्रात झाल्याचे समजते, ज्यामध्ये पाच लोक जखमी झाले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार हल्लानंतरचे बचाव कार्य पूर्ण झाले आहे आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वृत्तांनुसार तहरीक ए तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) रविवारी (5 फेब्रुवारी) या आतंकवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली. या संघटनेकडून सुरक्षा अधिकाऱ्यांताना निशाणा बनवले गेले होते. या हल्लाविषयी माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “थमाका होताच, खेळाडूंची सुरक्षा लक्षात घेताना सामना थांबवला गेला आणि खेळाडूंना काही वेळासाठी ड्रेसिंग रूममध्ये नेले गेले. काही वेळानंतर हा सामना पुन्हा सुरू केला गेला.” सामना पाहण्यासाठी मैदानात पूर्णपणे भरले होते. खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये गेल्यानंतर चाहते निराश झाले, पण सामना सुरू झाल्यानंतर पुन्हा त्यांच्या संघाला प्रोत्साहन देताना दिसले.

दरम्यान, या प्रकरणानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयला आयते भांडवल मिळाले आहे. आगामी आशिया चषक पाकिस्तानमध्ये आयोजित केला जाणार, असे ठरले होते. पण भारतीय संघ मागच्या बऱ्याच वर्षांपासून एकदाही पाकिस्तान दौऱ्यावर गेला नाहीये. आगामी आशिया चषकासाठीही भारत पाकिस्तान दौरा करणार नाही, असे बीसीसीआय सचिव जय शहा यांनी काही महिन्यांपूर्वी म्हटले होते. नुकतीच या मुद्यावर एसीसीची खास बैठक पार पडली असून जय शहा त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले जात आहे. (A terrorist attack took place near a stadium in Pakistan)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तो 60 डिग्रीपण नाहीये, घं***चा किंग’, सूर्याची कॉपी करणारा बाबर आझम नेटकऱ्यांकडून जोरदार ट्रोल
तब्बल 5 महिन्यांनंतर संघात पुनरागमन करताच ‘जड्डू’चा मोठा खुलासा; म्हणाला, ‘सर्जरी केली नसती तरी…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---