आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे नियम बनवणारी संस्था म्हणून मेरिलबोन क्रिकेट क्लबची ओळख आहे. बुधवारी (5 एप्रिल) एमसीएकडून पाच भारतीय क्रिकेटपटूंना एमसीसीचे अजीवन सदस्यपद दिले गेले आहे. भारतीय संघासाठी ही नक्कीच अभिमानाची बाब म्हणता येईल. यामध्ये भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीसह अजून चार दिग्गजांची नावे आहेत.
मेरिलबोन क्रिकेट क्लब (MCC) म्हणजचे एमसीसीने बुधवारी कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या 8 देशांमधून 19 खेळाडू निवडले. या 19 जणांनी एमसीसीचे अजीवन सदस्यपद देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या19 खेळाडूंच्या यादीत पाच खेळाडू एकट्या भारतीय संघाचे आहेत. एमएस धोनी (MS Dhoni), युवराज सिंग (Yuvraj Singh), सुरेश रैना (Suresh Raina), मिताली राज (Mithali Raj) आणि झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) या पाच भारतीयांची नावे या यादीत आहेत.
एमसीसीच्या बेवसाईटवर याविषयी लिहिले गेले आहे की, “पाच भारतीय खेळाडूंना अजीवन सदस्यपद देऊन सन्मानित केले गेले आहे. झुलन गोस्वामीने मागच्या वर्षी लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. झुलन महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारी गोलंदाज आहे. तसेच मिताली राज हिने 211 डावांमध्ये 7,805 धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या महिलांच्या यादीत ती पहिल्या क्रमांकावर आहे.”
“एमएस धोनी आणि युवराज सिंग दोघेही भारतीय संघाचा महत्वाचा भाग राहिले आहेत. त्यांनी 2007 आणि 2011 साली भारताला अनुक्रमे टी-20 आणि वनडे विश्वचषक जिंकवू दिला आहे. तसेच सुरेश रैना याने आपल्या 13 वर्षांच्या कारकिर्दीत वनडे प्रकारात 5500 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत,” असे वेबसाईटवर लिहिल्याचे दिसते.
या इतर खेळाडूंना या यादीत स्थान मिळाले, त्यात वेस्ठ इंडीजची मेरिसा एगुलेरिया, इंग्लंडचे जेनी गून, लॉरा मार्श, आन्या श्रबसोल, ऑयन मॉर्गन आणि केविलन पीटरसन सामील आहेत. पाकिस्तानच्या मोहम्मद हफीज, बांगलादेशच्या मसरफी मुर्तजा, दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेन, ऑस्ट्रेलियाच्या रिचेल हेन्स आणि न्यूझीलंडच्या एमी सॅटरवेट आणि रॉस टेलर यांची नावे सामील आहेत.
एमसीसीकडून नव्याने अजीवन सदस्यपद मिळालेले 19 खेळाडू
एमएस धोनी – भारत (2004-2019)
युवराज सिंह – भारत (2000-2017)
सुरेश रैना – भारत (2005-2018)
झूलन गोस्वामी – भारत (2002-2022)
मिताली राज – भारत (1999-2022)
जेनी गुन – इंग्लंड (2004-2019)
मेरिसा एगुलेरिया – वेस्टइंडीज (2008-2019)
मुहम्मद हफीज – पाकिस्तान (2003-2021)
राचेल हेन्स – ऑस्ट्रेलिया (2009-2022)
लॉरा मार्श – इंग्लंड (2006-2019)
ऑयन मॉर्गन – इंग्लंड (2006-2022)
मशरफे मुर्तजा – बांगलादेश (2001-2020)
केविन पीटरसन – इंग्लंड (2005-2014)
एमी सॅटरथवेट – न्यूझीलंड (2007-2022)
आन्या श्रुबसोल – इंग्लंड (2008-2022)
डेल स्टेन – दक्षिण आफ्रिका (2004-2020)
रॉस टेलर – न्यूझीलंड (2006-2022)
(A total of five Indian players, including MS Dhoni and Yuvraj Singh, have been given lifetime membership of the MCC)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धवनचे विक्रमांचे आणखी एक ‘शिखर’! यापूर्वी केवळ दोन दिग्गजांना जमलाय ‘तो’ कारनामा
न्यूझीलंड संघासाठी मोठी धक्का! केन विलियम्सन नाही खेळणार आगामी वनडे विश्वचषक