मागील अनेक दिवसांपासून भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्याचे पहायला मिळाले आहे. तो त्याच्या युट्यूब चॅनेलवर अनेक विषयांवर त्याचे मत स्पष्ट करत असतो. नुकतेच त्याने कसोटी सलामीवीरांबद्दल भाष्य केले आहे. यावेळी त्याने सध्याच्या घडीला सर्वोत्तम कसोटी सलामीवीरांची जोडीबद्दल सांगितले आहे.
आकाशने न्यूझीलंडची टॉम लॅथम आणि टॉम बंडेल ही सध्याच्या काळातील सर्वोत्तम कसोटी सलामीवीरांची जोडी असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांच्यापाठोपाठ मयंक अगरवाल आणि रोहित शर्मा ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कसोटी सलामीवीरांची जोडी असल्याचे त्याने सांगितले.
मागीलवर्षी भारतात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत पहिल्यांदाच मयंक आणि रोहित एकत्र सलामीला फलंदाजीसाठी उतरले होते. त्या मालिकेत दोघांनीही शानदार कामगिरी केली होती. रोहितने ५०० हून अधिक तर मयंकने ३०० हून अधिक धावा केल्या होत्या.
सध्याच्या कसोटी सलामीवीरांबद्दल बोलताना आकाश म्हणाला, ‘मी टॉम लॅथम आणि टॉम बंडेल यांना सध्याच्या घडीला सर्वोत्तम सलामीवीरांची जोडी म्हणून निवडेल. पण त्यांच्या जवळच दुसऱ्या क्रमांकावर मी रोहित आणि मयंक या भारतीय सलामीवीरांच्या जोडीला ठेवेल.’
‘मला आशा आहे की रोहित आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेल्यावर चांगली कामगिरी करेल आणि त्याला अनुभव मिळेल. १४ दिवसांसाठी क्वारंटाईन होण्याचाही क्रिकेटपटूंना फायदा होत आहे, कारण तूम्ही परिस्थितीशी चांगल्याप्रकारे जुळवून घेऊ शकता.’
तसेच आकाश पुढे म्हणाला, ‘सध्याच्या सर्वोत्तम सलामीवारांच्या जोडीमध्ये मी तिसऱ्या क्रमांकावर डेव्हिड वॉर्नर आणि जो बर्न्सला ठेवेल. वॉर्नर बाबत मी अजूनही खात्रीने सांगू शकत नाही. मला हा खेळाडू आवडतो परंतु आव्हानात्मक परिस्थितीत कसोटी सलामीवीर म्हणून मला त्याच्याबद्दल 100% खात्री नाही.’
लॅथम आणि बंडेल मागील काही काळापासून न्यूझीलंडकडून कसोटीत सलामीला फलंदाजी करत आहेत. त्या दोघांनी आत्तापर्यंत ८ कसोटी डावांमध्ये सलामीला एकत्र फलंदाजी केली असून यात त्यांनी ४७.१४ च्या सरासरीने ३३० धावा केल्या आहेत.
त्यांच्याबद्दल आकाश म्हणाला, ‘ते दोघेही चांगले आहेत, कारण त्यांनी न्यूझीलंडमध्ये कठिण परिस्थिती असतानाही त्यांच्या मायदेशात भरपूर धावा केल्या आहेत. लॅथमची ५३.९ आणि बंडेलची ४१.३ ची सरासरी आहे. बंडेलसाठी ऑस्ट्रेलिया दौराही चांगला होता. आपण या जोडीला बर्यापैकी चांगले म्हणू शकतो. टॉम लॅथमने भारतातही धावा केल्या असून ब्लंडेल येथे आला नव्हता.’
त्याचबरोबर आकाशने असेही म्हटले की एक काळ असा होता की क्रिकेटमध्ये खुप चांगल्या सलामीवीरांच्या जोड्या होत्या. पण सध्याच्या घडीला सलीमीवीर मुव्हिंग बॉल किंवा स्विंगवर संघर्ष करताना दिसतात.
महत्त्वाच्या बातम्या –
पाँटिंग आणि धोनी या दोघांत सर्वोत्तम कर्णधार कोण? आफ्रिदीने दिले ‘हे’ उत्तर
८ नोव्हेंबर नाही तर या दिवशी होऊ शकते आयपीएल२०२० ची फायनल
उमर अकमलची बंदी कमी करण्याबद्दल भडकला त्याचाच संघसहकारी, म्हणाला…
ट्रेंडिंग लेख –
क्रिकेटवर बनलेल्या या २ जबरदस्त बॉलिवूड चित्रपटांना दुर्लक्ष करुन चालणार नाही
आयपीएल २०२०: ‘या’ ३ कारणांमुळे विराटचा आरसीबी संघ यंदा जिंकू शकतो आयपीएल ट्रॉफी