भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. वरिष्ट खेळाडूंचा संघ इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारताच्या युवा खेळाडूंना संधी दिली गेली आहे. या संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या करणार असून राहुल त्रिपाठीला पहिल्यांदाच राष्ट्रीय संघात निवडले गेले आहे. असे असले तरी, माजी भारतीय खेळाडू आकाश चोप्राला वाटते की, त्रिपाठीला पदार्पणाची संधी मिळणे जवळपास अशक्य आहे.
आयपीएल २०२२ मध्ये राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व करत होता. हंगामात खेळलेल्या १४ सामन्यांमध्ये त्याने १५८ च्या स्ट्राईक रेटसह ४१३ धावा केल्या. त्रिपाठी हंगामातील सर्वाधिक धावा करणारा अनकॅप्ड खेळाडू देखील ठरला होता. या दमदार प्रदर्शनानंतर त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत संधी मिळावी, अशी चाहत्यांची इच्छा होती. पण निवडकर्त्यांनी त्याला या मालिकेत सहभागी केले नाही. काही दिवसांपूर्वा भारताचा वरिष्ठ संघ इंग्लंडला रवाना झाला आणि आयर्लंड दौऱ्यासाठी राहुल त्रिपाठीला संघात बोलावले गेले. परंतु माजी सलामीवीर फलंदाज आकाश चोप्रा (Aakash Chopra) याला नाही वाटत की, त्रिपाठीला संघ व्यवस्थापन प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देईल.
आयर्लंड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना आकाश चोप्रा म्हणाला की, “संघात आधीच ९ फलंदाज आहेत. दीपक हुड्डाला संधी मिळाली नाही. वेंकटेश अय्यरला संधी मिळाली नाही. जर आपण फलंदाजांवर नजर टाकली, तर वाटत की संजू सॅमसनला देखील संधी मिळणार नाही. कारण तुम्हाला त्या खेळाडूंना संधी देण्याची गरज आहे, जे आधीपासून संघात आहेत. ते संधीसाठी पात्र आहेत.”
दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या सुरू असेलल्या टी-२० मालिकेत अद्याप एकही बदल झाल्याचे पाहिले गेले नाहीये. याच कारणास्तव दीपक हुड्डा आणि वेंकटेश अय्यर बेंचवर बसलेले दिसतात. तर दुसरीकडे आयर्लंड दौऱ्यापूर्वी सूर्यकुमार यादवचे देखील संघात पुनरागमन होईल. अशात राहुल त्रिपाठीला संधी मिळणे खूपच कठीण असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारताचं नशीबं गंडलयं राव! पुन्हा एकदा टॉस जिंकत आफ्रिकेचा गोलंदाजी करण्याचा निर्णय
मिताली राजची जागा कोणीही भरून काढू शकत नाही, कर्णधार होताच हरमनप्रीतने केले महत्त्वाचे विधान
दौऱ्यापूर्वी लक्ष्मण यांनी दिला भारतीय संघाला मोलाचा संदेश, बीसीसीआयने फोटो केले शेअर