तब्बल दोन वर्षांपासून, ज्या गोष्टीची सगळे क्रिकेटप्रेमी वाट पाहत होते त्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची सुरुवात खऱ्या अर्थाने शनिवारी (१९ जून) रोजी झाली. भारतीय संघाचा पहिला डाव २१७ धावांवर आटोपल्यानंतर, न्यूझीलंड संघाची सध्या फलंदाजी सुरु आहे. त्यांनी तिसऱ्या दिवसाखेर (२१ जून) २ गडी गमावत १०१ धावा केल्या आहेत.
पाऊस आणि कमी प्रकाशाच्या व्यतत्यामुळे भारतीय दर्शक थोडेशे निराश झाले खरे पण अजूनही त्यांना संघाच्या दमदार पुनरागमनाची आस आहे. अशात माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाला या ऐतिहासिक सामन्यात पुनरागमन करण्यासाठी महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
स्टार स्पोर्ट्ससोबत बोलताना समालोचक आकाश चोप्राने संगितले की, “सध्या दोन्ही संघ कसोटी अजिंक्यपद सामन्यात बरोबरीवर असल्यासारखे वाटत आहेत. हा सामना जसा दिसतो आहे तसा नाही. भारतीय संघ अजूनही सामना आपल्या बाजूने करू शकतो. मी अजूनही सांगतो की, न्यूझीलंड संघ अजून खूप मागे आहे. धावफलकावर जरी न्यूझीलंड संघ ११६ धावांनी मागे असला तरीही त्यांना सामना आपल्या पारड्यात वळवण्यासाठी अजून १०० धावांची भर घालणे गरजेचे आहे.”
चोप्राने पुढे सांगितले की, “न्यूझीलंड संघाला अजून २१६ धावांची (भारताने दिलेल्या आव्हानातील १०१ धावा पकडून) गरज आहे. जर, त्यांनी केवळ १५० धावा केल्या तर न्यूझीलंड संघ सामन्यात मागे राहू शकतो. आपण भारतीय संघाला पहिल्या डावात पाहिलेच होते की, १४७/३ गडी बाद झाल्यानंतर सुद्धा भारतीय संघ २१७ धावांवर सर्वबाद झाला. भारतीय संघाला सामन्यात पुरागमन करण्यासाठी न्यूझीलंड संघाला पहिल्या डावात आघाडी घेण्यापासून रोखले पाहिजे. जर, न्यूझीलंडचा संघ आघाडी घेण्यास यशस्वी होतो तर भारतीय संघाला सामन्यावर ताबा मिळवणे कठीण जाईल.”
दरम्यान सर्वात मोठी बाब म्हणजे, साउथम्पटनमध्ये आज सुद्धा पावसाची चिन्हे दिसत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस पडू शकतो आणि ढगाळ वातावरणामुळे कमी प्रकशसुद्धा असू शकतो. असे असले तरीही, साउथम्पटनमध्ये असलेल्या समालोचक दिनेश कार्तिकने दिलेल्या अपडेट्सनुसार आज तिथे पाऊस पडला नाही. त्यामुळे सामना वेळेवर सुरू होण्याची शक्यता आहे. अशात चोप्राच्या सल्ल्यानुसार भारतीय संघ न्यूझीलंडला आघाडी घेण्यापासून थांबवू शकेल का नाही, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या-
भावा, कुठे स्विमिंग पुलमध्ये होणार का सामना? ‘ते’ ट्वीट करत भज्जी नेटिझन्सकडून झाला ट्रोल
कसोटी अजिंक्यपदचा पहिलावहिला विजेता मिळण्यासाठी दिग्गजांनी सुचवले ‘हे’ समर्पक पर्याय
WTC अंतिम सामना अनिर्णीत राहिल्यास भारताचा मोठा तोटा तर न्यूझीलंड फायद्यात; बघा कसं?