इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 62 वा सामना गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद संघात सोमवारी (15 मे) खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवरील या सामन्यात गुजरातने दणदणीत विजय मिळवला. त्याचवेळी हैदराबाद संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने डावात सर्वाधिक 5 बळी मिळवले. त्याच्या या कामगिरीनंतर त्याला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात संधी देण्यात यावी का? या प्रश्नावर समालोचक आकाश चोप्रा याने प्रतिक्रिया दिली आहे.
या सामन्यात भुवनेश्वरने पहिले षटक टाकताना तिसऱ्याच चेंडूवर गुजरात संघाचा सलामीवीर वृद्धिमान साहा याला झेलबाद करून तंबूत धाडले. आपल्या दुसऱ्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर कर्णधार हार्दिक पंड्या याला राहुल त्रिपाठीच्या हातून झेलबाद केले. यानंतर त्याने पुढील 3 विकेट्स या डावातील 20व्या आणि आपल्या चौथ्या षटकात घेतल्या. त्याने आपला स्पेल 4 षटकात 30 धावा देत 5 बळी मिळवून संपवला.
मागील काही सामन्यात भुवनेश्वर सातत्याने चांगले कामगिरी करत असल्याने अनेकांनी त्याला जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात संधी द्यावी असे म्हटले. मात्र, आकाश चोप्रा याने याबाबत काहीसे वेगळे मत व्यक्त केले. तो म्हणाला,
”मला विचाराल तर असे करायला नको. तो चांगली गोलंदाजी करत असला तरी त्या परिस्थितीत इतर गोलंदाज उत्तम कामगिरी करू शकतात. शमी व सिराज यांच्या रूपाने आपल्याकडे दोन उत्कृष्ट गोलंदाज आहेत. तसेच भुवी मागील बऱ्याच काळापासून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेला नाही.”
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी जसप्रीत बुमराह हा उपलब्ध असणार नाही. तसेच उमेश यादव व जयदेव उनाडकद हे देखील दुखापतग्रस्त आहेत. अशात मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर व मोहम्मद सिराज यांच्यावर भारतीय गोलंदाजीची जबाबदारी असेल.
(Aakash Chopra Not Considered Bhuvneshwar Kumar For WTC Final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गुजरातचा विजयरथ सलग दुसऱ्या हंगामात सुसाट! पुन्हा चालली हार्दिक-नेहराजींची जादू
शमीचा ‘पर्पल पॅच’ सुरूच! सनरायझर्सला लोळवत पुन्हा बनलाय नंबर वन