भारत व दक्षिण आफ्रिके (SA vs IND)मध्ये नुकतीच तीन कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. पहिला सामना भारतीय संघाने जिंकला आणि नंतरच्या दोन्ही सामन्यांत भारत पराभूत झाला. या मालिकेत भारताला अपयश का आले? याची अनेक कारणे सांगितली जात आहेत. दिग्गज खेळाडू सुनिल गावस्कर संघाच्या बचावात्मक क्षेत्ररक्षणावर नाराज असल्याचे दिसत आहे. तर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ने त्याच्या फलंदाजीला परभवास जबाबदार ठरवले आहे. भारताचा माजी फलंदाज आकाश चोप्रा (Aakash Chopra)ने या मालिकेतील भारताच्या पराभवाबाबत बोलताना हा सर्व विराट कोहलीच्या हट्टाचा (Virat Kohli’s Stubborness) परिणाम असल्याचे म्हटले आहे.
आकाश चोप्रा म्हणाला की, “जर तुम्ही दोन्ही संघांची तुलना केली, तर भारत हा खूपच चांगला संघ आहे. भारताने सर्व नाणेफेक जिंकून चौथ्या डावात २०० हून अधिक धावांचा पाठलाग केला. हा पराभव भारताला दीर्घकाळ डंख मारणारा आहे. एक सामना भारताने सेंचुरियन येथे जिंकला पण नंतरच्या दोन्ही सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. २०१८ च्या पराभवानंतर निश्चीतच दु:ख झाले होते. पण तेव्हा दोन्ही संघ बराबरीत होते. तिथे फलंदाजीमुळे आम्ही हारलो.”
व्हिडिओ पाहा- कर्णधार पद, रोहित, बीसीसीआय अन् बरंच काही… बोलतोय ‘किंग कोहली’
पुढे आकाश चोप्रा म्हणाला की, केपटाउनसाठी कोहलीने चुकीचे संयोजन केले. त्याच्या आग्रहाचा फटका संपूर्ण संघाला भोगावा लागला. तो म्हणाला, “जर तुमची फलंदाजी इतकी खराब असेल तर तुम्ही एवढा हट्ट का करताय? तुम्ही इतके ठाम का आहे की काहीही झाले तरी तुम्ही रिषभ पंतसोबत पाच फलंदाज आणि पाच गोलंदाज खेळवण्याचा हट्ट का करताय? पंतने शेवटच्या डावात नक्कीच शतक झळकावले होते. पण त्याआगोदर मालिकेत त्याची कामगिरी खास नव्हती. रहाणे धावा काढत नाही, पुजारा धावा काढत नाही, कोहलीने सुद्धा शतक केले नाही, तरीसुद्धा आम्ही पाच फलंदाज खेळवतो. माझं मत असं आहे की, हा थोडासा हट्टीपणा होता की, आम्ही हेच करणार.”
आकाशने सांगितले की, पाच गोलंदाजांना खेळवण्याची रणनीती भारताला महागात पडली. आकाश म्हणाला, “पाच गोलंदाज खेळवल्यानंतर तुम्हाला वाटले की, कमी धावसंख्येवरही तुम्ही त्याचा बचाव करू शकाल, पण तुम्ही ते करू शकला नाही. जेव्हा तुम्हाला खेळपट्टीवरून मदत मिळत असते आणि विरोधी संघाची फलंदाजी थोडी कमकुवत आहे हे तुम्हाला माहीत असते, तेव्हा तुम्हाला पाच गोलंदाजांची गरज नसते.”
महत्त्वाच्या बातम्या-
धोनीच्या तोंडून निघालेले बोल उतरले सत्यात, विराटच्या राजीनाम्यानंतर खरी ठरली ‘ती’ भविष्यवाणी
विराटनंतर रोहितला कसोटीचा संघनायक बनवण्याच्या तयारीत नाही बीसीसीआय? ‘या’ नावांवर आहे नजर
वनडे, टी२०त विराटचीच जागा घेणाऱ्या रोहित कसोटी कर्णधारपदाच्या निर्णयावरून सदम्यात, म्हणाला…
हेही पाहा-