---Advertisement---

अहमदाबाद की लखनऊ? कोणत्या संघात खेळणार राशिद?

On: गुरूवार, जानेवारी 13, 2022 6:25 PM
rashid-khan
---Advertisement---

भारतीय संघाचे माजी दिग्गज फलंदाज आकाश चोप्रा (aakash chopra) यांनी आयपीएलच्या (IPL 2022) पुढच्या हंगामाविषयी बोलताना राशिद खान (rashid khan) याच्याविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. अफगाणिस्तानचा दिग्गज खेळाडू राशिद खान याविषयी सध्या अनेक चर्चा आणि बातम्या पाहायला मिळत आहेत. असा अंंदाज बांधला जात आहे की, राशिद खान लखनऊऐवजी अहमदाबाद फ्रेंचायझीमध्ये सहभागी होऊ शकतो. आकाश चोप्रांच्या मते जर आकाश चोप्रा अहमदाबाद फ्रेंचायझीत गेला, तर ती एक चांगली निवड असेल.

आयपीएल २०२२ मध्ये आठ ऐवजी दहा फ्रेंचायझी मैदानात उतरणात आहेत. लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नवीन फ्रेंचायझी पुढच्या हंगामापासून स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या दोन नवीन फ्रेंचायझींच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचा मेगा लिलावदेखील आयोजित केला जाणार आहे. मेगा लिलाव आयोजित करण्यापूर्वी सर्व फ्रेंचायझींना त्यांच्या संघासाठी काही खेळाडू रिटेन करण्याची संधी मिळाली होती. दोन नवीन फ्रेंचायझींना देखील खेळाडू रिटेन करण्याची संधी मिळाली आहे.

राशिद खान लखनऊ संघात सामील होण्याची शक्यता नाही

स्वतःच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना माजी सलामीवीर आकाश चोप्रांनी राशिद खानविषयी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “बातम्या अशा येत आहेत की, हार्दिक पंड्या अहमदाबादचा कर्णधार बनणार आहे. तसेच, इशान किशन आणि राशिद खान हेदेखील अहमदाबाद संघात जाण्याच्या चर्चा होत आहेत. याचा अर्थ आहे की, राशिद लखनऊच्या संघात जाणार नाहीये. ही एकप्रकारे अप्रतिम योजना आहे. आशा हीच होती की, केएल राहुल आणि राशिद खान दोघे लखनऊ संघाचा भाग असतील, पण राशिद शक्यतो अहमादाबादमध्ये जात आहे.”

दरम्यान, यापूर्ण अशा बातम्या समोर आल्या होत्या की, राशिद खान लखनऊ संघात सहभागी होणार आहे. परंतु आता माध्यमांमध्ये अशा बातम्या समोर आल्या आहेत, की राशिद अहमदाबाद संघासोबत सामील होणार आहे. आयपीएलमध्ये नव्याने सामील होणाऱ्या लखनऊ आणि अहमदाबाद फ्रेंचायझीला २२ जानेवारीपर्यंत त्यांचे खेळाडू रिटेन करण्याची मुदत दिली गेली आहे. अशात राशिद पुढच्या हंगामात कोणत्या संघासाठी खेळणार हे पाहावे लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

आयपीएल २०२२ स्पर्धा कुठे होणार? काय आहे बीसीसीआयचा ‘प्लॅन बी’, घ्या जाणून

दक्षिण आफ्रिकेचा सुपरमॅन! किगन पीटरसनने हवेत झेपावत घेतला पुजाराचा भन्नाट एकहाती झेल

आयपीएल २०२२ स्पर्धेपूर्वी ‘या’ दोन संघांचा मोठा पराक्रम! लोकप्रियतेच्या बाबतीत टॉप-१० मध्ये स्थान

व्हिडिओ पाहा –

क्रिकेट अंपायर्सला मिळणारे मानधन| Cricket Umpire Salary

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---