भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने काल (११ ऑगस्ट) सांगितले की, तो वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा, मिशेल स्टार्क आणि जसप्रीत बुमराहपैकी कुणाला सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी निवडेल? तसेच, त्या गोलंदाजाला निवडण्यामागचे कारण काय असेल? Aakash Chopra Picks Best Bowler For Super Over From Malinga, Bumrah And Starc
वेगवान गोलंदाजांविषयी बोलताना चोप्रा म्हणाला की, “मला स्टार्क आणि मलिंगापेक्षा बुमराहला सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी द्यायला जास्त आवडेल. मलिंगा हा सिंह जरी म्हातारा झाला असला, तरी तो शिकार पकडायला विसरला नाही. आधीचे दिवस पाहिले तर, मलिंगाला सोडून दूसऱ्या कोणत्या गोलंदाजाला निवडणे हा अन्याय होईल. पण, जर माझ्याकडे मलिंगाला सोडून अजून नवे पर्याय उपलब्ध असतील, तर मी मलिंगाकडे जाणार नाही.”
“स्टार्क त्याच्या रिव्हर्स स्विंग यॉर्कर्समुळे प्रसिद्ध आहे. त्याला स्लोअर वन किंवा बाउंसर टाकण्याची गरज नाही. तो परिस्थीनुसार ६ यॉर्कर्सदेखील टाकू शकतो. तो ओव्हर द विकेटसोबत राउंड द विकेटवरही गोलंदाजी करु शकतो. याबोरबरच तो विकेटवर वाइड यॉर्करला वेगाने देखील टाकू शकतो. जर स्टार्क फॉ्र्ममध्ये असेल, तर मी त्याला निवडेल. स्टार्क आणि बुमराहमध्ये निवड करणे खूप कठीण आहे. जर मी ऑस्ट्रेलियन असतो तर स्टार्कला निवडले असते. पण मी भारतीय आहे म्हणून मी बुमराहला निवडणार,” असे पुढे बोलताना चोप्रा म्हणाला.
“बुमराहने गुजरात लायन्सविरुद्ध एक सुपर ओव्हर टाकली होती. त्यावेळी फलंदाजीसाठी ब्रेंडन मॅक्कलम आणि ड्वेन स्मिथ किंवा वेस्ट इंडिजचा कोणता तरी फलंदाज होता. त्या दोघांनाही त्यांच्या बॅटने चेंडूला स्पर्शदेखील करता आला नव्हता. बुमराहने षटकात एक नो बॉलदेखील टाकला होता. तरीही त्याच्या षटकात एकही धाव पडली नाही. स्टार्क एकावेळी एक बाउंड्री बॉल टाकू शकतो. पण बुमराह त्याच्या यॉर्करसोबत वेगळीच गोलंदाजी ऍक्शन करतो आणि हीच गोष्ट त्याला विशेष बनवते,” असे पुढे बोलताना चोप्राने म्हटले.
१९ सप्टेंबरपासून युएईत आयपीएलचा तेराव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. ५३ दिवस आयपीएल खेळले जाणार आहे. त्यामुळे अंतिम सामना १० नोव्हेंबरला होईल. यावेळी मुंबई इंडियन्सकडून बुमराह दमदार गोलंदाजी प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करेल.
महत्त्वाच्या बातम्या –
प्रसिद्धीच्या बाबतीत विराटच आहे अव्वल; टीम इंडियासहित ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूंना टाकलंय मागे
सीएसकेचे टेंशन वाढले, सुरुवातीच्या काही सामन्यातून बाहेर राहणार ‘हे’ धाकड खेळाडू
१९९४ साली असे काही घडले की, गॅरी कर्स्टनने स्वत: म्हणाले, मी तूला संघात स्थान देण्यासाठी शिफारस करेन
ट्रेंडिंग लेख –
ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये १२ चेंडूत अर्धशतक झळकावणारे ३ महारथी
४ दिग्गज कर्णधार ज्यांनी भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला
आयपीएलमधील धुव्वांदार फलंदाज व त्यांची आवडती मैदान जिथं ते गोलंदाजांना देत नाहीत सुट्टी