जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेनंतर पूर्ण क्रिकेट चाहत्यांचे लक्ष ऑक्टोबरमध्ये असलेल्या टी२० विश्वचषकावर आहे. हा विश्वचषक भारतात होणार होता. परंतु कोविड-१९ च्या महामारीमुळे हा विश्वचषक यूएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. सगळेच देश टी२० विश्वचषकासाठी जोरदार तयारी करत आहे. सध्या टी२० विश्वचषकामध्ये भारतीय संघ कसा असेल, यावर चर्चा रंगते आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने देखील टी२० विश्वचषकात भारतीय संघात कोणत्या वेगवान गोलंदाजांना स्थान मिळू शकते, याचा अंदाज बांधला आहे.
आकाश चोप्राने यावर्षी होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघासाठी वेगवान गोलंदाजांची निवड केली आहे. आकाशने कसोटी संघातून टी२० संघात मोहम्मद शमीला खेळवण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आकाशने सांगितले की, “टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी शमीची निवड करणे कठीण आहे आणि क्रिकेटच्या सर्वात छोट्या स्वरूपात त्याची कामगिरी फार खास नाही आहे.” आकाशने स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमारला शमीच्या तुलनेत जास्त पसंती दिली.
आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना आकाशने टी२० विश्वचषकासाठी भारतासाठी वेगवान गोलंदाज निवडले. “जर मला माझ्या पहिल्या तीन निवडी द्याव्या लागतील तर बुमराह प्रथम क्रमांकावर, भुवनेश्वर दुसऱ्या आणि मी तिसऱ्या क्रमांकासाठी दीपक चहरबरोबर जाईन आणि शमी माझ्या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर असेल. टी नटराजन पाचव्या क्रमांकावर असेल. पण, तिथे शार्दुल ठाकूर देखील आहे, इथे गोलंदाजांचा एक संपूर्ण मेळा आहे. सिराज आणि उमेश यादव देखील तेथे आहेत. पण हे माझे ठरलेले खेळाडू असतील. शमी माझ्या पहिल्या चारमध्ये असेल पण पहिल्या दोनमध्ये नाही. माझे पहिले दोन गोलंदाज बुमराह आणि भुवनेश्वर असतील आणि मी त्यांच्यापासून सामन्याचा प्रारंभ करू इच्छितो”, असे यावेळी तो म्हणाला.
शमीबद्दल बोलताना आकाश म्हणाला, ‘शमीची निवड होणे अवघड आहे. तो संघात असावा अशी सर्वांची इच्छा आहे. त्याने मागील वर्षी यूएईमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी चांगली कामगिरी केली होती. परंतु आता पंजाब किंग्जसाठी त्याची कामगिरी एवढी चांगली नव्हती. तो दुखापतीतून सावरत आहे आणि त्यामुळे तो पूर्णपणे लयीमध्ये नाही. जर आपण टी२० बद्दल बोललो तर ते एक असे स्वरूप आहे जिथे शमी थेट संघात येत नाही. तथापि, त्याने जर सतत चांगली कामगिरी केली आणि त्याने पाच सामन्यांची कसोटी मालिका आणि त्यानंतर आयपीएलमध्ये त्याने चांगला फॉर्म कायम ठेवल्यास तो संघात स्थान मिळवू शकतो.”
महत्वाच्या बातम्या:
शेफाली वर्मा १७ नव्हे तर २८ वर्षांची? जाणून घ्या काय आहे नक्की प्रकरण
सतत फ्लॉप ठरत असलेल्या श्रीलंकन क्रिकेटपटूंवर चाहत्यांचा संताप; उचलले ‘हे’ मोठे पाऊल