---Advertisement---

“मुंबई इंडियन्स विरूद्ध सलामीच्या सामन्यात ‘या’ प्लेइंग इलेव्हनसह उतरेल आरसीबीचा संघ”

On: रविवार, एप्रिल 4, 2021 7:48 PM
---Advertisement---

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला सुरुवात व्हायला आता अवघे ५ दिवस उरले आहेत. ९ एप्रिल रोजी गतविजेते मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघांमध्ये सलामीचा सामना खेळवला जाईल. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा संघ कोणत्या अकरा खेळाडूंसह उतरेल, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्राने नुकतेच यावर भाष्य केले असून त्याने या सामन्यातील बंगलोरची प्लेइंग इलेव्हन काय असेल, हे सांगितले आहे.

फलंदाजी आहे मजबूत
यंदाच्या हंगामासाठी निवडलेल्या खेळाडूंमध्ये बंगलोरच्या संघाचा फलंदाजी विभाग मजबूत असल्याचे दिसून येत आहे. कर्णधार विराट कोहली सध्या चांगल्या फॉर्मात असून तो बंगलोरच्या फलंदाजीचा मुख्य आधारस्तंभ असेल. तो सलामीला फलंदाजी करणार असून त्याच्यासह युवा देवदत्त पड्डीकल डावाची सुरुवात करेल. मधल्या फळीत युवा विकेटकीपर फलंदाज मोहम्मद अझरुद्दीन आणि न्यूझीलंडचा फिन एलेन आक्रमक फलंदाजी करतील. तर अनुभवी एबी डिव्हिलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यावर डाव सांभाळण्याची जबाबदारी असेल.

गोलंदाजी विभागावर केले आहे काम
यंदाच्या हंगामात बंगलोरच्या संघाकडे तगडे फिरकीपटू असल्याचे दिसून येत आहे. तसेच त्यांना अधिकाधिक सामने चेन्नई आणि अहमदाबाद येथे खेळवायच्या असल्याने त्यांच्या फिरकीपटूंना मदत मिळेल. आयपीएल मध्ये यशस्वी ठरलेला युझवेंद्र चहल त्यांचे प्रमुख अस्त्र असेल. तर त्याला वॉशिंग्टन सुंदर त्याला साथ देईल.
वेगवान गोलंदाजांमध्ये न्यूझीलंडचा कायले जेमिसन कोहली साठी महत्वाचा खेळाडू असेल तर त्याला मोहम्मद सिराज, नवदीप सैनी आणि डॅनियल ख्रिस्टियन साथ देतील.

आकाश चोप्राने निवडलेली बंगलोरची पहिल्या सामन्यातील प्लेइंग इलेव्हन –
विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पड्डीकल, रजत पटीदार, एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल ख्रिस्टियन, वॉशिंग्टन सुंदर, कायले जेमिसन, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी

महत्त्वाच्या बातम्या –

सीेएसकेच्या चिंतेत वाढ! जोश हेजलवूडची माघार, ‘या’ दोन गोलंदाजांनी दिला खेळण्यास नकार

व्हिडिओ : खतरनाक! पाकिस्तानी गोलंदाजाच्या चेंडूने टेंबा बवुमाच्या बॅटचे झाले चक्क दोन तुकडे

कोणावर करण्यात आले हत्येचे आरोप तर कोणी केली शेती; ‘हे’ आहेत आयपीएलनंतर कारकीर्द संपुष्टात आलेले १० क्रिकेटर्स

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---