---Advertisement---

गौतम गंभीरने धोनीबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर आकाश चोप्रा भडकला; म्हणाला…

On: शनिवार, जुलै 18, 2020 5:57 PM
---Advertisement---

मुंबई । भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि सध्याचे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या नेतृत्त्वाची तुलना केली जात आहे. नुकतेच स्टार स्पोर्ट्स शो ‘क्रिकेट कनेक्टेड’ या कार्यक्रमात माजी सलामीवीर गौतम गंभीरने धोनीच्या कर्णधारपदावर मोठे विधान केले होते.

गौतम गंभीरने शोमध्ये भाग घेत म्हटले होते की, जेव्हा धोनीला संघाची कमान देण्यात आली तेव्हा सौरव गांगुलीने त्याला एक तयार संघ सोपविला होता. पण धोनीच्या नेतृत्वात भारताला कोणतेही खास खेळाडू मिळालेले नाहीत.

गौतम गंभीरच्या या वक्तव्यामुळे धोनीच्या चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले. त्याचवेळी या विषयावर माजी फलंदाज आणि समालोचक आकाश चोप्रा याने देखील आपले मत स्पष्ट केले की, सौरव गांगुलीने धोनीपेक्षाही मॅचविनर खेळाडू भारताला दिले आहेत. या गौतम गंभीरच्या मताशी तो सहमत नाही.

आकाश चोप्राने आपल्या यूट्यूब चॅनेलवर याविषयी बोलताना, धोनीचे कौतुक केले आणि गौतम गंभीरला चोख प्रत्युत्तरही दिले.

तो म्हणाला, ‘जेव्हा धोनी कर्णधार होता तेव्हा संघ बदला मधून जात होता. बरेच मोठे खेळाडू आपल्या कारकीर्दीच्या अंतिम टप्प्यात होते. संघाची कामगिरी खराब होऊ न देता युवा खेळाडूंना भविष्यासाठी तयार करणे हे धोनीचे कार्य होते आणि त्यात त्यास यश आले. हे काम फक्त धोनीच करु शकला असता. त्याने संघात उत्तम प्रकारे बदल केला.’

धोनीच्या कर्णधारपदाचे कौतुक करताना आकाश चोप्रा म्हणाला की, त्याने भारताला क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठे 3 मॅच विनर खेळाडू दिले आहेत.

तो म्हणाला, ‘धोनीच्या नेतृत्वात विराट कोहलीसारखा जागतिक दर्जाचा फलंदाज भारताला मिळाला. 2014 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर खराब कामगिरी करणार्‍या विराट कोहलीला संघातून वगळले जाऊ शकले असले तरी धोनी त्याच्यासोबतच राहिला. धोनीच्या नेतृत्वात रोहित शर्माने यशाची चढती कमान राखली. धोनी कर्णधार असताना त्याने जसप्रीत बुमराहला संधी दिली.

आकाश चोप्राने धोनीच्या नेतृत्वाखाली भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, आर अश्विन, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना हे मॅच विनर खेळाडू धोनीच्या नेतृत्वात मिळाल्याचे म्हटले. तसेच धोनीच्या नेतृत्वाखालील हार्दिक पंड्या, मुरली विजय, केएल राहुल, युजवेंद्र चहल या खेळाडूंनीही आपली कारकीर्द सुरू केल्याचे आकाश चोप्राने म्हटले.

व्हिडिओच्या शेवटी आकाश चोप्रा म्हणाला, “सौरव गांगुली आणि एमएस धोनीची तुलना करणे चुकीचे आहे. कारण गांगुली आणि धोनी या दोघांनीही भारताला मोठे मॅच  विनर खेळाडू दिले आहेत.”

ट्रेंडिंग घडामोडी – 

दादा म्हणतो, ‘मला फक्त ३ महिने आणि मग पहाच…’

भज्जी पाजी यावर्षी खेळणार करिअरमधील शेवटचे आयपीएल?

‘या’ भारतीय दिग्गजाची विकेट घेणे पाकिस्तानच्या युवा गोलंदाजाचे ‘स्वप्न’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---