भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीची जागा भरून काढणे कोणालाही शक्य नाही. महेंद्र सिंग धोनी एक खुप मोठा खेळाडू राहिला आहे. पंरतु तरीही युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत कडे धोनीचा उत्तराधिकारी या रुपाने बघितला जात होते. रिषभ पंतकडे त्याप्रकारचे गुण आहेत.
पंतने गमावल्या मिळालेल्या संधी
पंतने आपल्या फलंदाजीने आणि यष्टीरक्षक या कौशल्याने भारतीय संघाच्या तीन ही प्रकारात स्थान मिळवले होते. ज्यामुळे त्याला भारतीय संघाचे भविष्य मानले जात होते. परंतु वेळेने अशी काही पलटी मारली की रिषभ आता भारतीय संघात जागा मिळविण्यासाठी संघर्ष करत आहे. मिळालेल्या संधीचे सोने करण्यात त्याला अपयश आले. त्यामुळे भलेही त्याला आता कसोटी संघात स्थान दिले आहे, मात्र तो प्लेईंग इलेव्हन मध्ये जागा मिळवू शकेल की नाही, हे अजून निश्चित नाही.
आकाश चोप्रा सुद्धा म्हणाले पंतला भारतीय संघात जागा मिळवणे अवघड
रिषभ पंतसाठी मर्यादित षटकांच्या सामन्यात पहिल्यांदा केएल राहुलने अडचणी निर्माण केल्या होत्या. केएल राहुलने आपल्या फलंदाजीने आणि यष्टीरक्षक कौशल्याने भारतीय संघात उत्कृष्ट कामगिरी करत त्याची जागा घेतली. मात्र पंत ऑस्ट्रेलिया दौर्यावर भारतीय संघाचा भाग आहे पण त्याला रिद्धीमान साहाला मागे सारून संघात जागा मिळविणे अवघड जाणार आहे. त्यामुळे भारतीय फलंदाज आकाश चोप्रा म्हणाले की संघात जागा मिळवणे त्याला अवघड जाईल.
आकाश चोप्रा आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हणाले, “रिषभ पंतला समजायला पाहिजे की जेव्हा ही त्याला संधी मिळते आणि ज्याप्रकारे तो बाद होत आहे, अशामध्ये तो सामना कसा समाप्त करू शकेल. त्याने मिळालेल्या संधीचा फायदा नाही घेतला. त्यामुळे यासाठी तो स्वतः दोषी आहे. रिद्धीमान साहाने सराव सामन्यात भारतीय संघासाठी यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडली होती. याचा सरळ अर्थ आहे की पंत कसोटीमधून स्थान गमावून बसला आहे.”
संबंधित बातम्या:
– बिग ब्रेकिंग! भारताचा दिग्गज खेळाडू पार्थिव पटेल याची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती
– भारतीय संघाची वाढली डोकेदुखी; हा प्रमुख खेळाडू होऊ शकतो पहिल्या कसोटीतून बाहेर
– हा खेळाडू भारताच्या कसोटी संघात असायलाच हवा, माजी महान फिरकीपटू शेन वॉर्नचे मत