---Advertisement---

दुबईत आयपीएल झाली तर ‘या’ संघाला होणार सर्वाधिक फायदा, समालोचक आकाश चोप्राने वर्तविले भाकीत

On: मंगळवार, जुलै 21, 2020 2:50 PM
---Advertisement---

यावर्षी होणारी टी२० विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बीसीसीआय ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यामध्ये युएई येथे आयपीएलचे आयोजन करण्याची शक्यता आहे. असे असले तरीही बीसीसीआयकडे श्रीलंका हा एक पर्याय आहे. या दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांनी यापूर्वीही आयपीएलचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे.

तरीही आतापर्यंत माध्यमांतील काही वृत्तांनुसार युएई या देशात आयपीएलचे आयोजन होणार असल्याचे म्हटले जात आहे. जर युएईमध्ये आयपीएलचे आयोजन झाले, तर कोणता संघ जिंकेल याबाबत भारतीय संघाचा माजी कसोटी सलामीवीर फलंदाज आकाश चोप्राने आपले मत स्पष्ट केले आहे.

२६ सप्टेंबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान होऊ शकते आयपीएलचे आयोजन

दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) प्रादुर्भावामुळे बीसीसीआयने अनिश्चित काळासाठी २०२० आयपीएल पुढे ढकलले आहे.

यापूर्वी आयपीएलचे (IPL) आयोजन २९ मार्च रोजी होणार होते. परंतु कोरोना व्हायरसमुळे आयपीएल सुरुवातीला १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित केले आहे. सध्या माध्यमातील काही वृत्तांनुसार, आयपीएलचे आयोजन २६ सप्टेंबर ते ७ नोव्हेंबरदरम्यान करण्याची शक्यता आहे.

आकाश चोप्राने म्हणतो, डबल हेडर सामने (एकाच दिवशी २ सामने) पहायला मिळू शकतात

“जर आयपीएलचे आयोजन २६ सप्टेंबर ते ७ नोव्हेंबर यादरम्यान झाले, तर एकूण ६ आठवड्यांचा कालावधी मिळेल. त्यामुळे आपल्याला यावेळी आयपीएलमध्ये डबल हेडर सामने पहायला मिळू शकतात. जेणेकरून लीग सामने ५ व्या आठवड्यामध्येच संपतील आणि ६व्या आठवड्यामध्ये प्लेऑफ आणि अंतिम सामन्यांचे आयोजन होईल,” असे आयपीएलबद्दल बोलताना चोप्रा (Aakash Chopra) म्हणाला.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला युएईमध्ये होईल फायदा

“तेथील परिस्थितीचा फलंदाजीवर अधिक परिणाम होणार नाही. काही संघांना तेथील परिस्थितींमध्ये चांगला फायदा होऊ शकतो. जर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे (Royal Challengers Bangalore) उदाहरण घेतले, तर त्यांची गोलंदाजी कमकुवत आहे. परंतु युएईमधील मैदाने मोठे आहेत. त्यामुळे आरसीबीला याचा फायदा होऊ शकतो. माझ्या मते, आरसीबी संघ कदाचित याबाबतीत उत्कृष्ट कामगिरी करू शकतो,” असे आरसीबी संघाबद्दल बोलताना चोप्रा म्हणाला.

ट्रेंडिंग घडामोडी-

-ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी या ११ खेळाडूंची होऊ शकते निवड

-आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक शतक झळकावणारे ५ फलंदाज

-क्रिकेटर झालेत नाराज, १० महिन्यांपासून अध्यक्ष असलेला गांगुली करत नाही हे काम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---