भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या ४ ऑगस्ट पासून ५ कसोटी सामन्यांची मालिका या दोन संघात खेळली जाणार आहे. या मालिकेपूर्वी इंग्लंडचा मुख्य अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने काही काळ क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे तर स्पष्ट आहे की, तो येणाऱ्या कसोटी मालिकेत खेळताना दिसून येणार नाही. याबद्दल माजी भारतीय क्रिकेटपटूने आपले मत वक्तव्य केले आहे.
भारतीय संघाचा माजी फलंदाज आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा याने आपल्या यूट्यूब चॅनेलवर म्हटले की, “बेन स्टोक्सची अनुपस्थिती भारतीय संघासाठी फायदेशीर ठरू शकते. एक खेळाडू म्हणून तो एका संघात दोन खेळाडूंसारखा आहे. कसोटी क्रिकेटमध्ये तो पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाज म्हणून खेळतो. तो स्वतःच्या जीवावर सामना जिंकवू शकतो. तो गोलंदाजी करुन गडी बाद करतो तर स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करताना अप्रतिम झेल टिपतो. त्यामुळे त्याची अनुपस्थिती भारतीय संघासाठी फायदेशीर ठरणार आहे.”(Aakash Chopra says ben stokes not playing against India is good news for us)
तसेच तो पुढे म्हणाला की, “बेन स्टोक्स बाहेर झाल्याने भारतीय संघावरील दबाव कमी होणार आहे. असे ही होऊ शकते की, भारतीय गोलंदाज त्यांच्या संघातील खालच्या फळीतील फलंदाजांना लवकर बाद करू शकतात. ही मालिका सुरू होण्यापूर्वीच इंग्लंड संघाला कमकुवत असल्यासारखे वाटत असेल.”
इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका
पहिली कसोटी- ४ ते ८ ऑगस्ट, नॉटिंघम
दुसरी कसोटी- १२ ते १६ ऑगस्ट, लॉर्ड्स
तिसरी कसोटी- २५ ते २९ ऑगस्ट, लीड्स
चौथी कसोटी- २ ते ६ सप्टेंबर, द ओव्हल
पाचवी कसोटी- १० ते १४ सप्टेंबर, मॅनचेस्टर
इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
रोहित शर्मा, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी,रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, केएल राहुल, रिद्धीमान साहा, अभिमन्यु ईश्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव
राखीव खेळाडू : प्रसिद्ध कृष्णा, अरजन नगवासवाला
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय दिग्गजाने निवडला टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ; चहल, कुलदीपला दिले नाही स्थान
‘तू भारताची शान आहेस’, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून २ ऑलिंपिक पदकं जिंकणाऱ्या पीव्ही सिंधूचं कौतुक