क्रिकेटमध्ये कायम फलंदाजी आणि गोलंदाजी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. आकर्षक फटके किंवा भेदक चेंडू चाहत्यांची वाहवा मिळवून जातात. मात्र याशिवाय क्षेत्ररक्षण हा देखील क्रिकेटमधील एक महत्वाचा पैलू असतो. क्षेत्ररक्षणातील एक अप्रतिम चमक, अख्खा सामना फिरवू शकते. कदाचित म्हणूनच ‘कॅचेस विन मॅचेस’ असे म्हंटले जाते.
पूर्वी क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणाला एवढे महत्व दिले जात नव्हते. मात्र जसजसे क्रिकेट विकसित होत गेले आणि वेगवान होत गेले, तसतसे क्षेत्ररक्षणाचे महत्व सगळ्यांच संघाना लक्षात येत गेले. त्यामुळेच आज आधुनिक काळातील सगळेच संघ क्षेत्ररक्षणावर विशेष मेहनत घेताना दिसतात. विविध मार्गांनी ते खेळाडूंना क्षेत्ररक्षणाचा सराव देतांना दिसून येतात. मात्र आकाश चोप्राने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला. ज्यातील क्षेत्ररक्षणाचा सराव बघून तुमच्याही भुवया नक्कीच उंचावतील.
आकाश चोप्राने शेअर केला व्हिडिओ
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्या समालोचक म्हणून कार्यरत असलेला आकाश चोप्रा सोशल मिडीयावर कायमच विविध प्रकारचे व्हिडिओ शेअर करत असतो. ज्यात कधी अतरंगी फटक्यांचा समावेश असतो तर कधी भन्नाट गोलंदाजीचा. या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर तो आपले समालोचन देखील टाकत असतो, ज्यामुळे त्यांची खुमारी अधिकच वाढते. आत्ताही त्याने असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे.
मात्र या व्हिडिओतील मुले फलंदाजी किंवा गोलंदाजी नाही तर क्षेत्ररक्षणाचा सराव करत आहे. पहिल्या व्हिडिओत मुले नदीकाठी हा सराव करतांना दिसून येत आहेत. झेल पकडण्यासाठी ते चक्क नदीत देखील सूर मारत आहेत. तर दुसर्या व्हिडिओत एक मुलगा मैदानात पाणी साचले असतांना देखील झेल पकडण्याचा सराव करतो आहे.
https://www.instagram.com/p/CP-hSZrjN12/?utm_source=ig_web_copy_link
https://www.instagram.com/p/CP8J3fUDpCR/?utm_source=ig_web_copy_link
आकाश चोप्राने शेअर केलेले हे व्हिडिओ सोशल मिडीयावर आता व्हायरल झाले आहेत. अनेकांनी या मुलांच्या समर्पणाचे कौतुक केले आहे. तर काहींनी व्यावसायिक खेळाडूंनी देखील अशा प्रकारच्या सरावाचे अनुकरण करावे, असा सल्ला दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘सबका बदला लेगा तेरा व्हाइट वॉकर!’, अश्विनच्या ‘त्या’ ट्विटवर जाफरचा भन्नाट रिप्लाय
किती हा राग? एकाच सामन्यात दोन वेळा सुटला शाकिबचा संयम, रागाच्या भरात उखडले स्टंप्स
भारतीय संघात प्रथमच निवड झालेल्या ऋतुराज गायकवाडने केले धोनीचे कौतुक, सांगितली ‘ही’ गोष्ट