भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने शनिवारी (१५ जानेवारी) कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा झाल्यानंतर त्याने टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. तर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India tour of South Africa) रवाना होण्यापूर्वी त्याला वनडे संघाच्या कर्णधार पदावरून काढून टाकण्यात आले होते. ही जबाबदारी रोहित शर्मावर सोपवण्यात आली होती. आता कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी देखील रोहित शर्माचे नाव सर्वात पुढे आहे. परंतु रोहित शर्माला कसोटी संघाचे कर्णधारपद दिल्यास कुठल्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो, याचा खुलासा माजी भारतीय क्रिकेटपटूने केला आहे.
भारतीय संघाचा माजी फलंदाज आकाश चोपडाचे (Aakash chopra) म्हणणे आहे की, कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी रोहित शर्मा प्रबळ दावेदार आहे. कारण तो सध्या वनडे आणि टी२० संघाचा कर्णधार आहे. तसेच गेल्या १ वर्षात त्याने कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे.
व्हिडिओ पाहा- विराटने कसोटीकर्णधारपद सोडताना का घेतले धोनी-शास्त्रीचं नाव।
तसेच तो पुढे म्हणाला की, “रोहित शर्माला (Rohit Sharma) फिटनेसमुळे अडचणीचा सामना करावा लागू शकतो. २०२० नंतर रोहित शर्मा पूर्णपणे फिट नाहीये. त्याला सतत दुखापतीमुळे संघाबाहेर राहावे लागत आहे. जर तो स्वतःला पूर्णपणे फिट ठेऊ शकत असेल तर तो पुढील कर्णधार होऊ शकतो.”
भारतीय संघाने २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. या दौऱ्यावर रोहित शर्मा दुखापतीमुळे उशिराने पोहोचला होता. तसेच नुकताच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मालिकेतून देखील तो दुखापतीमुळे संघाबाहेर झाला होता. तसेच अनुभव पाहता बीसीसीआय रोहित शर्माला ही जबाबदारी देऊ शकते. कारण विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी त्याला कसोटी संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले होते. आता त्याला कर्णधारपदाची जबाबदारी देखील सोपवली जाऊ शकते.
रोहित शर्माशिवाय केएल राहुलही कर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात त्याला ही जबाबदारी देण्यात आली होती. या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला होता. तसेच सुनील गावस्कर यांनी आता रिषभ पंतचे नाव देखील सुचवले आहे.
महत्वाच्या बातम्या :
कोहलीच्या निर्णयावर कुटुंबातून आली प्रतिक्रिया; भाऊ, बहिण म्हणाले, ‘आम्ही सदैव तुझ्या पाठिशी’
गावसकरांना रोहित नव्हे तर ‘या’ शिलेदारात दिसतोय भावी कसोटी कर्णधार, कारणासहित सांगितले नाव
हे नक्की पाहा: