वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघातील पहिल्या कसोटी सामन्याला 12 जुलैपासून डॉमिनिका येथील विंडसर पार्क मैदानावर सुरुवात झाली. या सामन्यासाठी भारतीय संघात 2 नवीन खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळाली. यामध्ये यशस्वी जयस्वाल आणि ईशान किशान यांचा समावेश आहे. यापूर्वी, भारताकडून 14 वनडे आणि 27 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळलेल्या ईशान याला संधी मिळाल्याने भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्रा याने काहीशी नाराजी व्यक्त केली आहे.
या सामन्या आधीच केएस भरत की ईशान अशी चर्चा सुरू झाली होती. भारतीय संघ भरतला आणखी एक संधी देईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, भारतीय संघ व्यवस्थापनाने ईशानला पदार्पण करवले. त्यामुळे भारताकडून केवळ पाच कसोटी खेळलेल्या भरतला बाकावर बसावे लागले. याच मुद्द्यावर बोलताना चोप्रा म्हणाला,
“भरतला संधी मिळेल असे वाटलेले. मात्र, ईशानला पदार्पण करून भारतीय संघ व्यवस्थापनाने भविष्याचा संदेश दिला आहे. भरत याने भारतात चार सामने खेळले आहेत. भारतात धावा काढण्यासाठी सर्वच जण संघर्ष करत असतात. भरत याच्या बॅटमधून देखील जास्त धावा निघाल्या नव्हत्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामन्यात त्याने चांगले यष्टीरक्षण केलेले. मात्र, आता ईशान संघात आल्याने त्याला पुढची संधी कधी मिळणार हे पाहावे लागेल.”
देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर भरत याला यावर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळण्याची संधी मिळालेली. तसेच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातही खेळताना दिसलेला. मात्र, फलंदाजीत प्रभाव पाडण्यात तो अपयशी ठरला. त्यामुळे पर्याय म्हणून ईशानकिशन याला संधी देण्यात आली आहे. भारताचा पहिला पसंतीचा यष्टीरक्षक रिषभ पंत दुखापतग्रस्त असल्याने अजून सहा महिने तरी मैदानापासून दूर राहू शकतो.
(Aakash Chopra Unhappy With Ishan Kishan Debute Say Bharat Deserve Chance)
महत्वाच्या बातम्या –
भारतीय संघात असे काही पहिल्यांदाच! शुबमन गिलच्या ‘या’ निर्णयामुळे माजी क्रिकेटपटू हैराण
मैदानावर होती विंडीजची शेवटची जोडी, अचानक नाचायला लागला शुबमन; डान्स कॅमेऱ्यात कैद