---Advertisement---

फिंच-वॉर्नर जोडीचा धूमाकुळ! श्रीलंकेला १३४ धावांच्या भागीदारीचा तडाखा देत ‘हा’ विश्वविक्रम नावावर

On: बुधवार, जून 8, 2022 6:02 PM
David-Waner-and-Aaron-Finch
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात संघाला तिन्ही प्रकारच्या क्रिकेट मालिका खेळायच्या असून ७ जूनपासून ३ सामन्यांच्या टी२० मालिकेला सुरुवात झाली. पहिल्याच टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान श्रीलंकेला मोठ्या फरकाने पराभूत केले. पहिला टी२० सामना ऑस्ट्रेलियाने १० विकेट्सने जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाच्या या विजयाचा शिल्पकार ऍरॉन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर ठरले. त्यांनी एक मोठा विक्रमही या सामन्यादरम्यान केला आहे.

या सामन्यात श्रीलंकेने ऑस्ट्रेलियासमोर १२९ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि ऍरॉन फिंच (Aaron Finch) यांनी सलामीला फलंदाजी करताना नाबाद १३४ धावांची भागीदारी (134 Runs Partnership) करत ऑस्ट्रेलियाला १४ षटकांत विजय मिळवून दिला. ही भागीदारी करताना वॉर्नरने ४४ चेंडूत नाबाद ७० धावा करताना ९ चौकार ठोकले. तसेच फिंचने ४० चेंडूत नाबाद ६१ धावा केल्या या खेळीत त्याने ४ चौकार आणि ४ षटकार मारले.

वॉर्नर आणि फिंचची विक्रमी भागीदारी 
वॉर्नर आणि फिंचने नाबाद १३४ धावांची भागीदारी करताना एका मोठ्या विक्रमालाही गवसणी घातली आहे. त्यांची अशी पहिलीच जोडी ठरली आहे, ज्यांनी वनडेत १० विकेट्सने विजय मिळवलेल्या सामन्यात २०० पेक्षा जास्त धावांची आणि आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये १० विकेट्सने विजय मिळवलेल्या सामन्यात १०० पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली आहे.

याशिवाय आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक शतकी भागीदारी रचणाऱ्या जोड्यांच्या यादीत ऍरॉन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांची जोडी तिसऱ्या क्रमांकावर आली आहे. फिंच आणि वॉर्नरची आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये शतकी भागीदारी करण्याची ही चौथी वेळ होती. त्यांनी रोहित शर्मा-शिखर धवन आणि मार्टीन गप्टील-केन विलियम्सन या जोड्यांची बरोबरी केली आहे. या दोन्ही जोड्यांनीही प्रत्येकी ४ शतकी भागीदारी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये केल्या आहेत.

या यादीत अव्वल क्रमांकावर बाबर आजम आणि मोहम्मद रिझवान आहेत. त्यांनी ६ वेळा शतकी भागीदारी आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये केल्या आहेत. तर, याच यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रोहित शर्मा आणि केएल राहुल या जोडीच्या नावावर ५ शतकी भागीदाऱ्या आहेत.

श्रीलंकेच्या फलंदाजांची हाराकिरी
श्रीलंकेने पहिल्या टी२० सामन्यात १९.३ षटकांत सर्वबाद १२८ धावा केल्या. श्रीलंकेकडून एकाही फलंदाजाला अर्धशतकी खेळी करता आली नाही. त्यांच्याकडून सर्वाधिक धावा पाथम निसंकाने केल्या. त्याने ३६ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून जोस हेजलवूडने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच मिशेल स्टार्कने ३ विकेट्स घेतल्या, तर केन रिचर्डसनने एक विकेट घेतली.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

ऐकलंत का! पाकिस्तानच्या माजी कर्णधारालाही आहे विराटवर विश्वास; म्हणतोय, ‘तो क्रिकेटच्या भल्यासाठी…’

‘या’ पाकिस्तानी खेळाडूची मुलगी रुग्णालयात देतेय मृत्यूशी झुंज

बापरे! नदालने फक्त बक्षीसांमधूनच कमावलेत हजारो कोटी, आकडा वाचून व्हाल थक्क

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---