पुणे। एम टेनिस अकादमी यांच्या वतीने आयोजित एमएसएलटीए-नवसह्याद्री क्रीडा संकुल अखिल भारतीय टॅलेंट सिरीज 12वर्षाखालील (7दिवसीय) टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत मुलांच्या गटात आर्यन किर्तने, सर्वज्ञ सरोदे, तनिष्क देवरे यांनी तर, मुलींच्या गटात श्रावि देवरे, काव्या पांडे या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
नवसह्याद्री क्रीडा संकुल येथील टेनिस कोर्टवर सुरु झालेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात पुण्याच्या बिगरमानांकीत आर्यन किर्तने याने अव्वल मानांकित आरव पटेलचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या सर्वज्ञ सरोदे याने पाचव्या मानांकित ऋषिकेश मानेचा टायब्रेकमध्ये 5-7, 7-6(6), 6-2 असा संघर्षपूर्ण पराभव केला. तनिष्क देवरेने आठव्या मानांकित राम मगदूमला 6-4, 6-2 असे पराभूत केले. राघव सरोदे याने सुजय देशमुखचा 6-3, 6-3 असा सहज पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
मुलींच्या गटात श्रावि देवरेने तिसऱ्या मानांकित तमन्ना नायरचे आव्हान 7-5, 6-0 असे संपुष्टात आणले. काव्या पांडे हिने आठव्या मानांकित रिशीता पाटीलचा 6-4, 6-4 असा पराभव करून आगेकूच केली. अव्वल मानांकित रित्सा कोंडकरने आपलॆ विजयी घौडदौड कायम ठेवत सातव्या मानांकित काव्या तुपेचा 6-1, 6-0 असा एकतर्फी पराभव केला. शिबानी गुप्तेने वीरा हरपुडेला 6-2, 6-2 असे नमविले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ(उपांत्यपूर्व फेरी):
12 वर्षांखालील मुले:
आर्यन किर्तने(महाराष्ट्र)वि.वि.आरव पटेल(महाराष्ट्र)(1)6-3, 6-2;
तनिष्क देवरे(महाराष्ट्र)वि.वि.राम मगदूम(महाराष्ट्र)(8)6-4, 6-2;
सर्वज्ञ सरोदे(महाराष्ट्र)वि.वि.ऋषिकेश माने(महाराष्ट्र)(5)5-7, 7-6(6), 6-2;
राघव सरोदे(महाराष्ट्र)वि.वि.सुजय देशमुख(महाराष्ट्र)6-3, 6-3;
12वर्षांखालील मुली:
रित्सा कोंडकर(महाराष्ट्र)(1)वि.वि.काव्या तुपे(महाराष्ट्र)(7)6-1, 6-0;
काव्या पांडे(महाराष्ट्र)वि.वि.रिशीता पाटील(महाराष्ट्र)(8)6-4, 6-4;
शिबानी गुप्ते(महाराष्ट्र)वि.वि.वीरा हरपुडे(महाराष्ट्र)6-2, 6-2;
श्रावि देवरे(महाराष्ट्र)वि.वि.तमन्ना नायर(महाराष्ट्र)(3)7-5, 6-0;
दुहेरी: उपांत्यपूर्व फेरी:
मुली:
रित्सा कोंडकर/काव्या पांडे वि.वि ऐश्वर्या स्वामिनाथन/मनस्वी राठोड 6-2, 6-3;
सारा फेंगसे/शिबानी गुप्ते वि.वि आरोही देशमुख/रितु ग्यान 6-4, 6-1;
प्रांजली पांडूरे/काव्या तुपे वि.वि अनुष्का जोगळेकर/ओजसी देगमवार 7-6(5), 6-2;
कीर्तियानी घाटकर/तमन्ना नायर वि.वि श्रावि देवरे/वीरा हारपुडे 4-6, 6-2, 10-7;
मुले:
राम मगदूम/ऋषिकेश माने वि.वि प्रजितरेड्डी मदिरेड्डी/अनिश वडनेरकर 6-1, 6-2;
सुजय देशमुख/नमिश हुड वि.वि ऋषभ गोचडे/नील बोंद्रे 7-6(5), 6-4;
आरव पटेल/आर्यन किर्तने वि.वि दिव्यांश बेहरा/कियान पटेल 6-1, 6-0;
वीरेन चौधरी/सय्यम पाटील वि.वि.वीर चतुर/विश्वास चंद्रसेकरन 6-1, 5-7, 10-4.